आ.अमित विलासराव देशमुख आणि आ.धीरज देशमुख यांच्या पुढाकारातून असंख्य निराधारांना मिळाली दिवाळीची भेट
लातूर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे ७ कोटी ८७ लाख ३३ हजार ८०० तर शहरी लाभार्थ्यांचे ४ कोटी ५८ लाख ९ हजार ४०० रुपये अनुदान बँक खात्यात जमा.
लातूर प्रतिनिधी : २२ ऑक्टोबर २०२२ :
संजय गांधी अनुदान योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात प्रभागनिहाय तसेच ग्रामीण भागात समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मार्च २०२२ अखेर दाखल केलेल्या पात्र लाभार्थीचे अनुदान मंजूर झाले असून ऑक्टोबर - २०२२ अखेर पर्यंतच्या ग्रामीण भागातील लाभार्थीचे अनुदानापोटी बॅंकांमध्ये ७ कोटी ८७ लाख ३३ हजार ८०० रुपये तर लातूर शहरातील पात्र लाभार्थीचे ४ कोटी ५८ लाख ९ हजार ४०० रुपये इतके अनुदान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना झिरो बॅलन्स मध्ये बँक खाते उघडून देण्यासाठी सहकार महर्षी ,माजी मंत्री तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख ,बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्याकडून आवश्यक सर्व सहकार्य करण्यात आले. मंजूर यादीतील सर्व लाभार्थ्यांनी आपापल्या बँकेत जाऊन आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली अनुदान रक्कम उचलून घ्यावी, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समिती व तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लातूर शहरातील विविध १८ प्रभागात तसेच ग्रामीण भागात सन २०२१-२२ वर्षात संजय गांधी निराधार अनुदान योजना समाधान शिबिरे घेण्यात आली होती. या समाधान शिबिरात सहभागी होऊन आवश्यक कागदपत्र पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थीना येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या आवश्यक गरजांची पूर्तता व्हावी, संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियासह दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा याकरीता माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून संबंधित विभाग व संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहर व ग्रामीण यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून आता या संबंधित सर्व पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
यामध्ये ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत पात्र ठरलेल्या संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचा समावेश असून संबंधित बॅंकांमध्ये लातुर शहर व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे तब्बल १२ कोटी ४५ लाख ४३ हजार २०० रुपये इतक्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
मंजूर यादीतील सर्व निराधार लाभार्थ्यांनी आपापल्या बँकेत जाऊन आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली अनुदान रक्कम उचलून घ्यावी, अशी माहिती संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहर माजी अध्यक्ष हकीम शेख, माजी अध्यक्ष लातूर ग्रामीण प्रवीण पाटील,तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार श्रावण उगले, संजय गांधी निराधार योजना समिती माजी सदस्य लातूर शहर दगडूआप्पा मिटकरी, भालचंद्र सोनकांबळे, मनोज देशमुख, नरेश कुलकर्णी, बरकत शेख, बंडू सोलंकर, अंजली चिंताले, माजी सदस्य लातूर ग्रामीण अमोल देडे,शीतल सुरवसे,धनंजय वैद्य, हरीश बोळंगे,अमोल भिसे,संजय चव्हाण,परमेश्वर पवार, रमेश पाटील, आकाश कणसे तसेच तहसील प्रशासनाचे अव्वल कारकून शाहनवाज पठाण, संजय जाधव,महसूल सहाय्यक शबाना पठाण, सुप्रिया बिराजदार,आशा पाटील,श्री.कोपरकर, श्री.जाधव, ऑपरेटर शेख हसमुख,श्री.आदमाणे यांच्याकडून एका प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे .