आ.रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सुंदर गाव योजना पुरस्कारप्राप्त उटी (बु.) व घनसरगावचा गौरव
लातूर दि. २१- आर. आर. आबा पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भादा सर्कल मधील उटी (बु.) या गावाने जिल्हास्तरीय प्रथम तर रेणापुर तालुक्यातील मौजे घनसरगाव ग्रामपंचायतने तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
शासनाचा आर. आर. पाटील सुंदर गाव हा मानाचा पुरस्कार लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील उटी बु. या गावास जिल्हास्तरीय ५० लक्ष रुपयाचा प्रथम पुरस्कार तर रेणापुर तालुक्यातील मौजे घनसरगाव या गावात तालुकास्तरीय १० लक्ष रुपयाचा प्रथम पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी शुक्रवारी भाजपाच्या संवाद कार्यालयात उटी गावचे सरपंच अँड भालचंद्र पाटील, उपसरपंच रफिक शेख आणि घनसरगावचे सरपंच शरद दरेकर, उपसरपंच प्रवीण शिंदे यांचा पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
स्वच्छ व सुंदर शाळा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, बंदिस्त गटारी, विरंगुळा केंद्र, स्मार्ट अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रातील सोयी सुविधा आणि ग्रामपंचायत कडून तत्परतेने मिळणारी सर्व प्रकारचे कागदपत्र प्रमाणपत्र यासह विषयात गावकऱ्यांच्या सहकार्याने दोन्ही ग्रामपंचायतीने अत्यंत चांगले काम केले असून कौतुकास्पद आहे. या कामाची प्रेरणा घेऊन इतर गावच्या ग्रामपंचायतीही सुंदर गाव ही योजना निश्चितपणे राबवतील अशी अपेक्षा यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख डॉ, बाबासाहेब घुले, घनसरगाव येथील अँड श्रीकांत सूर्यवंशी, भरतराव कापसे, बालासाहेब पवार धर्मराज शिंदे हनुमंत पवार, श्रीधर अडसुळे, शंकरराव शिंदे, सुरेश जाधव, रावसाहेब जाधव, साहेबराव शिंदे, सतीश दरेकर, राम अडसुळे, देविदास वीरकर, गुणवंत सूर्यवंशी, केशव देशमुख, धर्मराज शिंदे, श्रीरंग दाताळ, शेख मोहम्मद महैनदिन, शफीउद्दीन शेख, प्रकाश जाधव, दगडू इंगोले आदी तर उटी येथील चेअरमन बन्सी देशपांडे, व्हाईस चेअरमन दशरथ कांबळे, भाजपा बुथ प्रमुख मारुती शिंदे, हरि देशमुख, ग्रामसेवक महेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य भागवत कांबळे, विनोद अंधारे, बळीराम शिंदे, प्रयागबाई कांबळे, वैशाली कांबळे, माधुरी भोकरे, सारिका कांबळे, रामदास भोजने यांच्यासह अरुण अंधारे, गुंडू भोकरे, महालिंग स्वामी, शाहिद शेख, सुमित सुरवसे, अमोल सुळ, लक्ष्मण इंगळे, तानाजी कांबळे, लक्ष्मण कांबळे, अबूजर मनियार, चंद्रकांत भोकरे, अमर उबाळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ रमेशआप्पा कराड यांचे उटी आणि घनसरगाव येथील ग्रामस्थांनी प्रारंभी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.