गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
एग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनीच्या फिल्ड सुपरवाइजरास लाच घेताना रंघेहात पकडले
दिनांक 30सप्टेंबर रोजी मिळालेल्या तक्रारी नुसार यातील तक्रारदार यांना, लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या करारा नुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी साठी कार्यरत असलेल्या एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लि.च्या वतीने काम पाहणारे टॅलेंट प्रो.पीपल रिसोर्स सोल्युशन्स चे फिल्ड सुपरवायझर यांनी तक्रारदार यांचे शेतात जास्तीचे नुकसान झाले बाबत केलेल्या पंचनाम्याचा मोबदला म्हणून, तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणे करीता सर्वोतोपरी मदत करणे कामी इतर लोकसेवक क्र.1आनंद मोहनराव कांबळे, वय 36 वर्ष, पद-फिल्ड सुपरवायझर, टॅलेंट प्रो. पीपल रिसोर्स सोल्युशन्स, नेमणूक- तालुका प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लि. ता.चाकुर, जि. लातूर व इतर लोकसेवक क्र.2संदीप जालिंदर बानाटे, वय 28 वर्ष, पद - फिल्ड सुपरवायझर, टॅलेंट प्रो. पीपल रिसोर्स सोल्युशन्स, नेमणूक- तालुका प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लि. ता.चाकुर, जि.लातूर यांनी एकत्रितपणे 3500/- रु. ची पंचासमक्ष लाच मागणी केली.
तक्रारदार यांनी इतर लोकसेवक क्र.1 कांबळे यांना फोन केला असता त्यांनी इतर लोकसेवक क्र.2 बानाटे यांचे कडे लाच रक्कम देण्यासाठी सांगितली.
थोड्या वेळाने तक्रारदार लाच मागणी केलेली रक्कम घेवून इतर लोकसेवक यांचे कार्यालयात गेले असता इतर लोकसेवक क्र.2 बानाटे यांनी पंचा समक्ष लाच रक्कम 3500/- रु स्विकारली.
बानाटे यांनी कांबळे यांना लाच रक्कम स्विकारली असले बाबत फोनवरून कळविल्याने दोन्ही आरोपितांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
श्री. धरमसिंग चव्हाण,अपर पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
➡ *पर्यवेक्षण अधिकारी:-*
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. लातूर.
➡ *सापळा पथक:-*
भास्कर पुल्ली व अन्वर मुजावर, पोलीस
निरीक्षक ला.प्र.वि. लातूर आणि ला.प्र.वि. लातूर
टीम
➡ *तपास अधिकारी:-*
भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि.लातूर
-----------------------------------------------------------
लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन.. करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर - 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. लातुर
मोबाईल नंबर - 09309348184
ला.प्र.वि.लातूर कार्यालय दुरध्वनी - 02382-242674
@ टोल फ्रि क्रं. 1064