५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात रक्तदान शिबीर संपन्न
या कॅम्पमध्ये दि. २१ ऑक्टोबर 2022 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसी कॅडेट्स , पी आय स्टाफ व एनसीसी ऑफिसर मिळून एकुण ७३ जणांनी रक्तदान केले आहे.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार यांनी केले आहे. त्यांनी जास्तीत जास्त कॅडेट्सनी रक्तदान करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी कॅडेट्सना मार्गदर्शन करताना चीफ ऑफिसर महावीर काळे म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. एनसीसी कॅडेट्स यांनी सामाजिक जाण ठेवून सतत समाजाच्या विकासासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , लातूर येथील रक्तपेढीत रक्त संकलन करण्यासाठी डॉ. श्रीकांत बिरादार, डॉ. सुमित कमटलवार, एस आय चौधरी, बी डी सूर्यवंशी, गौरीशंकर स्वामी, हणमंत देडे, आर. एस. जाधव हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी चीफ ऑफिसर महावीर काळे, कॅप्टन ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, लेफ्टनंट हरिभाऊ पावडे, लेफ्टनंट सरस्वती वायभासे,थर्ड ऑफिसर राजेश देवकर, बालाजी मुस्कावाड, सचिन गिरवलकर, जगदीश नमनगे , अप्पासाहेब वाघमोडे सर, सु. दिलीप दामोर, सु. शेखर थोरात, सु. भोपाल सिंग, सु. विष्णू कच्छवे, ना. सु. दिलीप शेंडगे, ह. सुखविंदर पाल, ह. ललित सिंह, ह. योगेश बारसे, ह. पंकज बावस्कर, ह. दादा मुटे, ह. हरी गायकर, ह. अजमेर, ह. देवराज बिस्वाल, ह. अशोक कडरेल, बी एच एम ह. बिपिन पाल सिंह यांनी परिश्रम घेतले आहे.