888
डायबीटीस एंडोक्रायनोलॉजीची वैद्यकीय सेवा लातूरमध्ये उपलब्ध-आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी २३ आक्टोंबर २२ :
शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी केंद्राबरोबरच वैद्यकीय सेवेचे केंद्र म्हणूनही विकसित होत असलेल्या लातूर शहरात बरुरे डायबीटीस एंडोक्रायनोलॉजी अँड मॅटर्निटी या अद्यावत हॉस्पिटलची भर पडली आहे. त्यामुळे कमी खर्चात अनेक रुग्णांना येथे उपचार मिळणार आहेत ही आनंदाची बाब आहे असे नमूद करून या परिसरातील रुग्णांना वेळेत चांगल्या दर्जाच्या उपचार सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
लातूर शहरातील पहिले व एकमेव एंडोक्रायनोलॉजी हॉस्पिटलचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज रविवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील मेन रोड येथील राठी टाऊन सेंटरमधील डॉ. रामदास बरुरे आणि डॉ. देविका बरुरे (भिकाने) यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या बरुरे डायबीटीस एंडोक्रायनोलॉजी अँड मॅटर्निटी केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते..
यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण बरमदे, डॉ.एस.एन. जटाळ, सरस्वती भारतराव बरुरे, डॉ. भारत भिकाने, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, समद पटेल, प्रा. अहिल्याताई गोजमगुंडे, श्याम बरुरे, हरिश्चंद्र बरुरे, नागनाथ बरुरे, विष्णुदास धायगुडे, संजय पाटील खंडापूरकर, डॉ. रमेश भराटे, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. मंदाडे आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी बरुरे कुटूंबीय मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बरुरे डायबीटीस एंडोक्रायनोलॉजी अँड मॅटर्निटी केअर सेंटरची पाहणी केली.
या प्रसंगी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, दिपावलीच्या निमित्ताने बरुरे कुटुंबिय लातूर शहरात नावीन्यपूर्ण वैद्यकीय सेवेत पदार्पण करत आहेत. हा क्षण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. या निमित्ताने आज हभप भारत महाराज बरुरे यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. त्यांचा व देशमुख कुटुंबियांचा स्नेह होता माझी आणि त्यांची अनेकदा भेट झाली. हभप भारत महाराज बरुरे यांची कीर्ती लातूर पुरती मर्यादित नव्हती तर त्यांची कीर्ती मराठवाड्यासह महाराष्ट्रात होती. त्यांच्या जीवनातील उमेदीचा कार्यकाळ, यशस्वी कार्यकाळ, जीवनाशी संघर्ष करण्याचा काळ आपण सर्वांनी जवळून पाहिला आहे. बरुरे कुटुंबिय वैद्यकीय सेवेत पदार्पण करून एंडोक्रायनोलॉजीची सेवा सुरू करीत आहे, या क्षेत्रातील डॉक्टर शोधूनही सापडत नाहीत, खूप कमी डॉक्टर या क्षेत्रात असतात. ही सेवा येथे सुरू करण्यात येत आहे, या दवाखान्यात माफक दरात यावर उपचार केले जातील. वैदयकीय क्षेत्रातील डॉक्टर्सनी आजार झाल्यावरच उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूर आयएमएने डायबेटीस व इतर रोगाविषयी चर्चासत्र आयोजित करावी, प्रत्येकाने आरोग्यदायी जीवनशैली अंगीकरावी बरुरे कुटुंबीयांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे सांगून त्यांनी मराठवाड्यात एंडोक्रायनोलॉजीचे फक्त दोनच सेंटर आहेत. शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राज्यातील रुग्णही लातूर उपचारासाठी येतील प्रत्येकाने आरोग्यदायी आहार घ्यावा, व्यायाम करावा, फिटनेसकडे लक्ष द्यावे असे सांगून त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, डॉ.एस.एन.जटाळ, डॉ. शैलेजा बडगीरे यांनी मनोगत व्यक्त केले, तर डॉ. रामदास बरुरे यांनी बरुरे डायबीटीस एंडोक्रायनोलॉजी अँड मॅटर्निटी केअर सेंटरची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत आरदले यांनी केले तर आभार श्याम बरुरे यांनी मानले.
888