Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये व्यापार्यास चाकूने वार करून पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये व्यापार्यास चाकूने वार करून  पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक. 
स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी..




                याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील छत्रपती शिवाजी चौक येथे उड्डाणपुलावर अज्ञात दोन आरोपींनी पाठलाग करून एका व्यापाऱ्याला अडवून त्याच्यावर चाकूने वार करून पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून पळून गेले होते. त्या संदर्भाने पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा नंबर 404/2022 कलम 394 34 भा द वि प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला होता. 
                सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी,लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा लातूर चे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात विविध पथके तयार करून रवाना करण्यात आले होते.
                 सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक 02/10/ 2022 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, दहा ते बारा दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी चौकातील उड्डाण पुलावर व्यापाऱ्याला अडवून लुटमार करणारे इसम खोरी गल्लीत भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत. अशी माहिती मिळाल्याने माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथकाने लागलीच खोरी गल्ली येथील संशयित आरोपी राहत असलेल्या भाड्याच्या रूमवर छापा टाकला. तेथे दोन इसम आढळून आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 

1) एक मच्छिंद्र लक्ष्मण कोतलापुरे, वय 29 वर्ष, राहणार वैशाली नगर, लातूर सध्या राहणार खोरी गल्ली, लातूर.

2)गोपाळ ज्ञानोबा कोतलापुरे, वय 26 वर्ष, राहणार महादेव नगर, लातूर. सध्या राहणार खोरी गल्ली, लातूर.

             असे असल्याचे सांगून दोघांचा मित्र संजय बत्तीशे अश्या तिघांनी सदरची रूम भाड्याने घेतल्याचे सांगून आम्ही काही दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याचा पाठलाग करून त्यास शिवाजी चौकातील उड्डाण पुलावर रस्त्यावर अडवून चाकूने हल्ला केला व त्याच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने चोरून नेली होती असे सांगितले. तसेच त्यांनी गुन्ह्यात चोरलेले रोख 1 लाख 4 हजार
रक्कम , बॅग, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 01 लाख 60 हजार रुपयाचा मुद्देमाल काढून दिला तो मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याच्या पुढील तपास कामी नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास
सपोनी प्रवीण राठोड ,पोलीस ठाणे शिवाजीनगर करीत आहेत.
                
                  वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कुशलतेने गोपनीय यंत्रणा सतर्क करून विविध सराईत गुन्हेगाराकडे तपास करून खूप काही पुरावे उपलब्ध नसतानाही सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे .
           
            सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजेश कंचे, नवनाथ हासबे, यशपाल कांबळे, राजू मस्के, बंटी गायकवाड, तूराब पठाण , नकुल पाटील यांनी केली आहे.
Previous Post Next Post