पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
लातूर, दि. 27 (जिमाका):-* राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.3नोव्हेंबर) सकाळी अकराला नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, विशेष घटक उपयोजना आणि आदिवासी विकास उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत सप्टेंबरअखेर प्राप्त प्रस्ताव व झालेल्या खर्च आढावा घेण्यात येणार आहे. तसेच सन 2023-24 करिता जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा विषयी चर्चा करण्यात येणार आहेत.