दसरा मेळाव्याच्या जाहिराती मधून उपमुख्यमंत्री गायब..
फडणवीस समर्थकांचा नाराजगीचा सुर
लातूर- लातूर शहरातून मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसऱ्या मेळाव्यास किमान चार ते पाच हजार, तर सर्व जिल्ह्यांतून ५० हजार शिवसैनिक मुंबईत पोहोचतील, असा दावा करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून लातूर मधून तब्बल 50ट्रेव्हल्स बुक करण्यात आल्याची माहिती मिळाली असून प्रत्येक गाडीसाठी लाखोंरुपये हवाला मार्फत आल्याचे आता उघड चर्चा होवू लागली आहे.त्यातच आता ठाकरे, तसेच शिंदे या दोन्ही गटांनी या मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली असून, मोठ मोठ्या जाहिराती प्रिंट मीडिया ला देण्यात आल्या आहेत परंतू त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा फोटो गायब..असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लातूरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातून फडणवीस समर्थकांचा नाराजगीचा सुर उमटत आहे
ज्या फडणवीसांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेवून पोहचवले त्यांचा फोटो जाहिरातीमधून गायब असल्याने नेमका हिंदुत्वाचा नारा हा फक्त शिंदे गटाचाच आहे का ..? असा प्रश्न आता कट्टर फडणवीस समर्थकांडून विचारला जावू लागला आहे.
का..?ते दसरा मेळाव्यास येणार नाहित असाही प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात उमटू लागला आहे.
तापलेले राजकीय वातावरण पाहता या शिवसैनिकांच्या प्रत्येक घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत.
शिवसेनेतील बंडानंतर मुंबईत दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचा मेळावा हा दादर येथील शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा हा ‘बीकेसी’ येथील मैदानावर होत आहेत. दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याने लातूरमधून मुंबईला जाणाऱ्या शिवसैनिकांची संख्या लक्षणीय असेल, अशी अटकळ बांधण्यात येत आहेत. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार ४० ते ५० हजार शिवसैनिक मुंबईला जातील, असे अपेक्षित आहे.
महामार्गावर कोंडी टाळण्यासाठी नियोजन
दसरा मेळाव्यासाठी पुणे मुंबई द्रुतगती मार्ग व जुना पुणे-मुंबई मार्गावरून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांनी पोलिसांनी नियोजन केले आहे. यासाठी पेट्रोलिंग मोबाइल व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. टोल नाका, लोणावळा, खंडाळा परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. द्रुतगती मार्ग व जुन्या महामार्गावर शंभर पोलिस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे. त्यांच्या मदतीला १०० होमगार्ड राहणार आहेत. या दोन मार्गांबरोबरच इतर ही मार्गावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन केले आहे, अशी माहिती पुणे महामार्ग अधीक्षक लता फड यांनी दिली.
शिंदे गटाची तयारी
- ‘बीकेसी’ मैदानावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास लातूर शहरातून ५० ते ६० बसेस, तसेच किमान १०० चारचाकी वाहनांतून चार ते पाच हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत.
- तरुण कार्यकर्त्यांमध्ये या पहिल्याच मेळाव्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
- या गटातून हजारों शिवसैनिक ‘बीकेसी’वर पोहोचतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या सर्व शिवसैनिकांना मुंबईत नेणे, परत आणणे; तसेच त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लागल्याचे सांगण्यात आले आहे.
ठाकरे गटही आक्रमक
- लातूर शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत दादरला शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
- शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा १९६६मध्ये तेथे उपस्थित असणारे लातूर मधील कार्यकर्तेही यंदा दसरा मेळाव्यास येणार आहेत.
- लातूरातून हजारोंच्या संखेने शिवसेना कार्यकर्ते तेथे उपस्थित असतील, असा दावा शहर प्रमुख शिवाजी माने यांनी केला आहे.