'माझं लातूर' परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा....सप्तफेरेचा लातूररत्न पुरस्कार जाहीर
लातूर-सप्तफेरे वधू वर सूचक केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या लातूररत्न पुरस्कारासाठी माझं लातूर परिवाराची निवड करण्यात आली असून हा पुरस्कार येत्या ३० ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते लातूरात होत असलेल्या सप्तफेरे गुणगौरव सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
माझं लातूर परिवाराच्या लक्षवेधी आणि दिशादर्शक सामाजिक उपक्रमांची दखल घेत सप्तफेरे निवड समितीने हा मानाचा पुरस्कार माझं लातूर परिवाराला घोषित केला आहे.
केंद्रीय मंत्री मा.भगवंत खुब्बा यांच्या हस्ते येत्या ३० ऑक्टोबर रोजी स्वानंद मंगल कार्यालय, रिंग रोड याठिकाणी संपन्न होत असलेल्या सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात माझं लातूर परिवारास लातूररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याप्रसंगी लातूरचे खासदार मा. सुधाकर श्रृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा पुरस्कार माझं लातूर परिवाराच्या प्रत्येक सदस्याच्या निस्वार्थ सेवेला समर्पित असून माझं लातूरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.