गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
खाजगी ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मुत्यु ;मुत्युचे तांडव ,अनेकांची प्रकृती चिंताजनक
दिंडोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात नाशिक -औरंगाबाद मार्गावरील नांदुरनाका परिसरात एका हाॅटेल जवळ खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून १०जणांनचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बातमी वार्यासारखी पसरली .
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदुरनाका परिसरातील मिरची हाँटेल जवळ शुक्रवारी रात्री हा भीषण अपघात झाला असून अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हला भीषण आग लागली आणि १०जणांनचा होरपळून मृत्यु झाला. या अपघातात अनेक जण भाजल्याची बातमी समोर येत आहे.
शुक्रवारी रात्री बसला लागलेल्या आगीत १० जणांचा मुत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे.मुत्युदेह आणि जखमी लोकांना रुग्णालयात नेण्यात आलेले आहे.आम्ही अद्याप डॉक्टरांच्या पुष्टीसह मुत्युचा नेमका आकडा समोर आला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ही बस यवतमाळहुन मुंबईकडे जात होती.हि चिंतामणी ट्रँव्हल कंपनीचे बस असल्याची माहिती समोर आली आहे या बसला धुळ्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकसोबत धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. असे अपघात स्थळी बोलले जात आहे. या अपघातात आठ ते दहा जणांचा जागीच होरपळून मुत्यु झाला. अपघातातील जखमींना अग्नीशामक दलाने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.स्लीपर बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. तसेच जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील हाँटेल मिरची चौकात पहाटे झालेल्या अपघातात बसचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. आग इतकी भीषण होती की ती ओट्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली. तरीही पण तोपर्यंत आठ ते दहा जणांचा होरपळून मुत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात अंदाजे पहाटे ४.२० ते ४.४५वाजेच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ट्रकचा चालक हा अपघात होतांच फरार झाल्याचे सांगण्यात येते.
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकारी व आयुक्तांसी चर्चा झाली असून या घटनेत मुत्युमुखी पडल्यांच्या कुटुंबीयांना तातडीने पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर जखमींना योग्य उपचारांसाठी सर्व शासकीय मदत दिली जाईल. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका येथे बसला झालेल्या दुर्दैवी भीषण अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला तर जखमींवर उपचार सूरु आहेत.
या घटनेची तातडीने दखल घेऊन नाशिक येथील दुर्घटनास्थळाला भेट देत प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून अपघाताबाबत विस्तृत आढावा घेतला. त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार करण्यात येतील व गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील असेही स्पष्ट केले.
या घटनेची गंभीर दखल घेऊन मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच जखमींवर विनामूल्य उपचार करण्यात येतील असेही स्पष्ट केले आहे.
अशाप्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महामार्गावरील ब्लाइंड स्पॉट शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न करू तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असलेल्या वाहनांची देखील तपासणी करून त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करू असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या अपघातग्रस्त बसमध्ये एकुण ४८ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी १० जणांचा मुत्यु झाला असून असंख्य गंभीर रित्या जखमी अवस्थेत आहे.
सध्या उपचार घेत असल्याची संख्या पुढीलप्रमाणे:-
●पुरुष संख्या :- १९
●स्त्री संख्या :-०८
●लहान मुलगा :-०१
●लहान मुलगी :-०१
एकुण :-२९ जण उपचार घेत आहे.