लातूरचे नविन पोलिस अधिक्षक सोमय मुंडे तर आयुक्तपदी बाबासाहेब मनोहरेसोमय विनायक मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहेत. 31 वर्षे वयाच्या सोमय विनायक मुंडे यांचं लहानपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटीमध्ये झालेय. सोमय मुंडे यांचे शालेय शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कूलमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी झालंय. सोमय यांनी आयआयटी आणि एमटेक ही पदवी संपादन केलेली असून, सोमय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2016 ची परीक्षा पास होऊन IPS अधिकारी झालेत.
डॉ. मुक्ता विनायक मुंडे आणि डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव
आयपीएस अधिकारी सोमय मुंडे हे देगलूर येथील डॉक्टर दाम्पत्य डॉ. मुक्ता विनायक मुंडे आणि डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव आहेत. वडील विनायक मुंडे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सनगाव येथील मूळ रहिवाशी असून, गेल्या 40 वर्षांपासून देगलूर येथे स्थायिक आहेत. डॉ. विनायक मुंडे हे जनरल सर्जन तर आई डॉ. मुक्ता ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. त्यांना दोन मुले असून, सोमय हे थोरले असून मुलगी सुमंता ह्या कॉम्प्युटर सायन्स करतायेत.
पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी
सोमय विनायक मुंडे यांची पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी झाली. त्यानंतर ASP अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे आणि आता गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे ऍडिसनल एसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर अनेक धाडसी कार्यवाही केल्यात. ज्यात मार्च 2021 छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उद्ध्वस्त करत एन्काऊंटर कार्यवाही करून शस्त्र हस्तगत केले होते. तर जून 2021 रोजी गडचिरोली येथील अटापल्ली येथे धाडसी कार्यवाही करत 13 नक्षलींना कंठस्नास घातले होते.

लातूर: राज्यातील राजकीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून अधिका-यांच्या बदल्या आणि रिक्त जागांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या.दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील ४३ आयपीएस आणि आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असल्याची माहिती समोर आली आहे.
गृहविभागाच्या या आदेशामुळे लातूरचे पोलिस अधिक्षक म्हणून सोमय मुंडे, नांदेडचे पोलिस अधिक्षक म्हणून श्रीकृष्ण कोकाटे तर हिंगोलीचे पोलिस अधिक्षक म्हणून संदिप सिंह गील आणि परभणीच्या पोलिस अधिक्षक म्हणून रागसुधा आर. यांची वर्णी लागली आहे.
तर नांदेड – वाघाळा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना पदोन्नती देत लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
लातूर पोलिस अधिक्षक नियुक्त झालेले मुंडे हे या पुर्वी गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधिक्षक होते. तर नांदेडचे नवनियुक्त पोलिस अधिक्षक कोकाटे ब्रहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त होते. हिंगोली पोलिस अधिक्षक गील हे हिंगोलीतीलच राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक म्हणून कार्यरत होते. परभणीच्या नवीन पोलिस अधिक्षक रागसुधा आर जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक होत्या.
तर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस अधिक्षक शिरीष एल. सरदेशपांडे यांची सोलापूर (ग्रामीण) च्या पोलिस अधिक्षकपदी बदली झाली आहे. लातूर येथील पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांची गोंदिया पोलिस अधिक्षक पदी बदली करण्यात आली. तर नाशिक येथील ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन अशोक पाटील यांची औरंगाबादचे नवीन पोलिस अधिक्षक (गुन्हे शाखा) म्हणून बदली करण्यात आली.
श्रीकृष्ण कोकाटे नांदेडचे नवे पोलिस अधिक्षक
ब्रह्मुंबई पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड चे पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नांदेडचे पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या बदलीचे आदेश मात्र गृहविभागाने राखून ठेवले आहेत.
बाबासाहेब मनोहरे लातूरचे नवे मनपा आयुक्त
नांदेड – वाघाळा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची लातूरचे नवे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमन मित्तल यांची बदली झाल्यापासून लातूर महापालिकेत आयुक्त पद रिक्त होते.
धनंजय आर कुलकर्णी – पदस्थापनेच्या प्रतीक्षेत – पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
पवन बनसोड- अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा- पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
बसवराज तेली -पोलीस उप आयुक्त नागपूर शहर- पोलीस अधीक्षक,सांगली
शेख समीर अस्लम -अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली- पोलीस अधीक्षक, सातारा
अंकित गोयल-पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
राकेश ओला- पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर
एम. राजकुमार- पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव
सारंग डी आवाड – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा
गौरव सिंह – पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक- पोलीस अधीक्षक, यवतमाळ
संदीप घुगे – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ११ नवी मुंबई – पोलीस अधीक्षक, अकोला
रवींद्रंिसग एस. परदेशी – उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
नुरुल हसन- पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा
निखील ंिपगळे -पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया
निलोत्पल- पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली
संजय ए बारकुंड- पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे
श्रीकांत परोपकारी- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर
राज्य पोलीस सेवा अधिकारी
लक्ष्मीकांत पाटील- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
पराग शाम मणेरे- पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई
पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निघणार
(१) मोहित कुमार गर्ग, (२) राजेंद्र दाभाडे, (३) दीक्षितकुमार गेडाम, (४) अजय कुमार बन्सल, (५) अभिनव देशमुख, (६) तेजस्वी सातपुते (७) मनोज पाटील, (८) प्रविण मुंडे, (९) जयंत मीना, (१०) राकेश कलासागर, (११) पी. पी. शेवाळे, (१२) अरंिवद चावरिया, (१३) दिलीप पाटील- भुजबळ, (१४) जी. श्रीधर, (१५) अरंिवद साळवे, (१६) प्रशांत होळकर, (१७) विश्वा पानसरे (१८) प्रविण पाटील, या भा.पो.से. अधिका-यांची आणि (१९) निकेश खाटमोडे, रा.पो.से. या अधिका-यांची बदली करण्यात आली आहे, मात्र त्यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.