Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अमित ठाकरे यांच्या लातूर जिल्हा दौऱ्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमित ठाकरे यांच्या लातूर जिल्हा दौऱ्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद






लातूर :- महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा मनसे नेते अमित ठाकरे हे सध्या मनविसे पुनर्बांधणी तथा पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत याच अनुषंगाने काल दि. 7/10/22 रोजी ते लातूर जिल्ह्या दौऱ्यावर आले असता जिल्हा प्रवेशावेळी शिवली तालुका औसा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच तेथे विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील प्रचंड जनसमुदाय जमला होता तिथून ते लातूर येथे आले असता लातूरमध्ये छत्रपती चौकात त्यांचे लातूर शहरातर्फे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते जमले होते दि 8/10/22 रोजी सकाळी 11 वाजता वाजत गाजत राजीव गांधी चौकात वाहतूक सेनेची शाखा करण्यात आली त्यानंतर जिल्हाभरातून खास भेटण्यासाठी आलेल्या हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी सोबत टप्प्याटप्प्याने बैठका घेण्यात आल्या यावेळी अमित साहेबांनी विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला यात विद्यार्थिनींची संख्या लक्षणिय होती अमित ठाकरे यांचा जिल्हा दौरा विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठा प्रतिसाद देत विद्यार्थी प्रश्न संदर्भात अमित ठाकरेशी मनमोकळी चर्चा केली.तसेच विद्यार्थी समस्याचे निराकरण करण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर चालु करण्यात आला विद्यार्थी संवादानंतर अमित साहेबांनी लातूर मधील पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला तद नंतर जिल्हाभरातील पक्षाच्या पदाधिकारी सोबत पक्ष संघटनात्मक बांधणी तथा पक्ष वाढीसंदर्भात बैठक घेतली सर्व पदाधिकारी सोबत संवाद साधला तसेच लातूर वरुन नांदेडला जात असताना मनविसेच्या वतीने गुरुड चौक येथे केनच्या साह्याने प्रचंड मोठा हार घालुन सत्कार करण्यात आला यावेळी अमित साहेबांनी मनविसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या घरी सदिच्छा भेट दिली तसेच अहमदपुर येथे त्यानी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करुन नांदेडकडे रवाना झाले. दौऱ्याप्रसंगी अमित साहेब ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते दिलीपबापु धोत्रे प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे मनविसे नेते कीर्ती कुमार शिंदे महेश ओवे जिल्हाध्यक्ष संजय राठोड जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाणे,शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे शहराध्यक्ष मनोज अभंगे मनविसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रणवीर उमाटे स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष सचिन शिरसाट कामगार जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष वाहेद शेख महिला जिल्हाध्यक्ष प्रीतीताई भगत अर्जुन कोळी लाला मोहिते माधव गीते वैभव जाधव बालाजी पाटील धनंजय मुंडे रोहित पवार अजय कलशेट्टी कुलदीप यादव बजरंग ठाकूर गोविंद उदगिरे जहांगीर शेख नवनाथ सावळकर परमेश्वर पवार ज्ञानेश्वर कदम नारायणगिरी संग्राम रोडगे बाळासाहेब शिवशक्ती मुकेश देशमाने सोमनाथ कलशेट्टी सुरज पटेल रामदास तेलंगे शुभम चंदनशिवे सह जिल्हाभरातील सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आलेले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
Previous Post Next Post