Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट थांबवा

खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट थांबवा 
: शहर प्रमुख दिनेश बोरा - परवेज पठाण 



लातूर : दीपावली सणानिमित्त मुंबई - पुणे, छत्रपती संभाजीनगर , नागपूर यासारख्या मोठ्या शहरातून गावाकडे येणाऱ्या प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्स चालक अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करून त्यांची आर्थिक लुबाडणूक करीत आहेत. असे कृत्य करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी ही लूट त्वरित थांबवावी, तसेच दोषींवर विनाविलंब कठोर कार्यवाही करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना चे लातूर शहर प्रमुख दिनेश बोरा, परवेज पठाण यांनी एका निवेदनाद्वारे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच दिपावलीनिमित्त मुंबई - पुणे येथून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेला पाच अतिरिक्त बोगी वाढविण्याची मागणीही त्यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांकडे केली आहे. 
लातूर जिल्हा व परिसरातील अनेक नागरिक, विद्यार्थी उपरोक्त शहरात वास्तव्यास आहेत. दीपावलीचे औचित्य साधून ही मंडळी आपल्या गावाकडे येत असतात. त्यांची ही गरज बघून खाजगी ट्रॅव्हल्स चालक नेहमीच्या तिकिटांपेक्षा दुप्पट - तिप्पट पैसे आकारून त्यांची आर्थिक लुबाडणूक करीत आहेत. हे पाहून जिल्हा प्रमुख एड. बळवंत जाधव यांच्या निर्देशानुसार दिनेश बोरा व परवेज यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे अशी लूट करणाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे अशी लूट करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी विशेष समिती नियुक्त करून ही कार्यवाही गतीने करण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावेत असेही निवेदनात नमूद केले आहे. 
त्याचप्रमाणे रेल्वेच्या सोलापूर येथील वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनाही एक निवेदन देऊन बोरा व पठाण यांनी दीपावलीच्या दरम्यान मुंबई - पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी लातूर मुंबई रेल्वेला पाच अतिरिक्त बोगी वाढविण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या दोन्ही निवेदनावर जिल्हा प्रमुख एड. बळवंत जाधव, शहर प्रमुख दिनेश बोरा, परवेज पठाण, जिल्हा समन्वयक विजयकुमार स्वामी, शहर संघटक एड. बालाजी सूर्यवंशी, उपशहर प्रमुख विजयकुमार कांबळे, वाहतूक सेनेचे हरिभाऊ डोपे, ज्येष्ठ शिवसैनिक संदीपमामा जाधव, श्रीनिवास लांडगे, ज्ञानेश्वर सागावे , प्रशांत स्वामी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
Previous Post Next Post