कॉक्सिटने संगणकासोबतच
इतर शैक्षणिक क्षेत्रातही उतरावे
अद्ययावत संगणक प्रयोग शाळेचा कुलगुरू डॉ. भोसले यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर, दि.२- नोकर्या देणारे शिक्षण सुरू करून कॉक्सिटने महाविद्यालयाचे नाव देशभर पोहोचविले. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नोकर्या मिळाल्या. या महाविद्यालयाने आता इतर शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून तेथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पुढे यावे, ई अपेक्षा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांनी केले.
येथील कॉक्सिट महाविद्यालयातील अद्ययावत संगणक प्रयोग शाळेचे उद्घाटन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी माजी कुलगुरू डॉ. मधुकर गायकवाड, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. रमाकांत घाडगे, डॉ. अशोक मोटे, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, डॉ. बी. एल. गायकवाड उपस्थित होते.
डॉ. उध्दव भोसले म्हणाले, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून रुजू झाल्यापासून कॉक्सिटचा नावलौकिक ऐकून होतो. या महाविद्यालयाने संगणकशास्त्रसारख्या नव्या विषयातील शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले, हेच मोठे कौतुकाचे आहे. त्यापुढे जाऊन प्रवेश घेतलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना नोकरी देण्याची हमी हे महाविद्यालय घेत आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नोकर्या मिळाल्या आहेत. वरचेवर नोकर्या मिळणार्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढतच आहे. सर्व सुविधांनी युक्त असलेले, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून मला कॉक्सिटचा अभिमानच नाही तर गर्व असल्याचे ते म्हणाले.
संगणकशास्त्रात या महाविद्यालयाने प्रगती साधली आहे. उर्वरित क्षेत्रातही डॉ. एम. आर. पाटील यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या शिक्षण क्षेत्रातील जाणकारांची कमतरता भासत आहे. या संस्थेने इतर शैक्षणिक क्षेत्रातही यावे, असे आवाहन डॉ. उध्दव भोसले यांनी यावेळी केले.
यावेळी पेट व नेट / सेट परीक्षेत यशस्वी झालेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक व गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. उध्दव भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी केले. प्रा. कैलास जाधव यांनी टे्रनिंग व प्लेसमेंट विभागाच्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश पवार यांनी केले.
नियमित शिक्षणातील नैराश्य टाळण्यासाठी
कॉक्सिटची स्थापना ः डॉ. एम. आर. पाटील
अध्यक्षीय समारोपात संस्थाध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, नियमित शिक्षणातून नोकर्या मिळण्याची शक्यता धूसर होत चालली होती. यामुळे शिक्षणाविषयी तरुणांमध्ये नैराश्य येत होते. अशावेळी प्राध्यापकपदाच्या नोकरीचा राजीनामा देवून गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराच्या नोकर्या देणारे संगणक शिक्षण लातूरमध्ये उपलब्ध केले. सुरुवातीच्या काळात अडचणी आल्या. परंतु, काळाची पावले ओळखून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच जॉब रेडी बनवण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. यामुळे आज घडीला अनेक नामांकित आयटी कंपन्या कॅम्पस मुलाखतीसाठी येत आहेत. यातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नोकर्या उपलब्ध होत आहेत, असे ते म्हणाले.