गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बापरे...बाभळगाव कडून शिरशी कडे जाणारा अख्खा कॅनल गायब..!
नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे प्रचंड नाराजगी
लातूर-लातूरचे नाव शिक्षणामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात नावझाले आहे परंतू याच शिक्षणाचा गैरफायदा येथील काही लोक भ्रष्टाचार करण्यासाठी करत असल्याचे आता समोर येत आहे. त्याचे उदाहरणही तसेच समोर आले आहे बाभळगाव म्हटले तर माननिय विलासराव देशमुख यांच्या कार्याची आठवन येते,अतिशय संयमाने मोठमोठे विषय अगदी सहजपने ते पेलावत होते.त्यांच्या शब्दावर रात्रीतून रोड तयार होत असत तेही कोणालाही न दुखावता परंतू आता मात्र अशी परिस्थिति बघायला भेटत नाही. येथील रोड रुंदीकरणाच्या नावावर बाभळगाव येथील रहिवाशांच्या रोड सोडून घरासमोरील फरश्या उचकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार दि १३आक्टोंबर रोजी घडला असुन तेथील नागरिकांनी अक्षरशः भ्रष्टाचाराचा पाढाच समोर आणला असुन,मागील काही लोकांच्या जमीनी कॅनल साठी देण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी कॅनल झाला ही, परंतू सध्या तो कॅनलंच गायब ..असल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले आहे.त्याठिकानी पाहिले असता फक्त दोन फुटाची नाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तेथील नागरिकांच्या म्हणन्यानुसार तो संपुर्ण कॅनल बुजवण्यात आला असून त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरत आहे.केलेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी तातडीने घाईगडबडीने नाली खोदण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणावर वेळीच मा. आमदार अमित देशमुख यांनी लक्ष घालून कॅनल पुर्वरत करण्याची मागणी आता तेथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.