लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो साठी व्यवसायिक ५०स्टाॅल,
मात्र महानगरपालिकेला नाममात्र दर
लातूर:कोरोनाच्या काळात लातूरकरांच्या इतिहासात पहिल्यांदाच बिल्डर लाॅबीला घरघर लागली होती.त्यामुळे बरेचसे लातूर मधील नामांकित बिल्डर हे पुणे येथे स्थायिक झाले होते.त्याठिकाणी त्यांनी आपले बरेचशे प्रोजेक्ट लाॅंच केले.परंतू कोरोना काळानंतरही याचा परिणाम दिसत होता त्यामुळे बरेच फ्लैट पडून होते.याचा फायदा या बिल्डर लॉबी ने बहुतेक घेण्याचे ठरवले असावे म्हणुनच त्यांनी लातूरमध्ये लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो साठी ५०व्यवसायिक स्टाॅल उभारले, प्रत्येक व्यवसायिक स्टाॅल कडून लाखोंचे भाडे अकारल्याचे आता उघड चर्चा शहरामध्ये होवू लागली आहे परंतू
महानगरपालिकेला नाममात्र ५०००/-रुपये,४५००/-स्वच्छता आणि ईतर कर व१००००/-रूपये अनामत रक्कम देण्यात आल्याचे आता समोर आले आहे. एवढ्या कमी भाड्यात महानगरपालिकेने कसे दिले असे विचारले असता ,ठरावच तस्यापध्दतीने असल्याचे सांगीतले आहे.
टाऊनहॉलच्या मैदानावर २५००० फुटाचा सभामंडप उभारण्यात आला असून या एक्सपोत शहरातील बिल्डर्स, ग्राहकांना परवडतील व आवडतील अशा स्वरूपाची घरे उपलब्ध करून देणार असल्याचे स्वप्न जरी दाखवत असले तरी लातूर ची जनता हुशार असुन लातूर येथील प्रोजेक्ट पाहून ती योग्यच पर्याय निवडतील यात काही शंका नाही.विशेष म्हणजे या लाॅबीतील बहुतांश बिल्डरांचे फ्लैट हे पुणे मुंबई याठिकानी रिकामे पडून असल्याचे बोलले जात आहे आणि हेच फ्लैट विकण्यावर भर देणार असल्याचे आता उघड होवू लागले आहे.लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो हे एका विशिष्ट पक्षाने पुरस्कृत असल्याचे चर्चेला उधान आले आहे.
या कार्यक्रमास
क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया तर प्रमुख उपस्थिती म्हणून आ. रमेश कराड, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद खैरनार यांची उपस्थिति असणार आहे