औसा विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लागणार
औसा: औसा मतदारसंघातील विकास कामांचा व इतर महत्त्वाच्या विषयांवर आ. अभिमन्यू पवार यांनी मुंबई येथे नुकतीच विविध खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेऊन वन उद्यान विकसित करणे, आरोग्य विषयक विषय मार्गी लावणे अंगणवाडी सेविका व मदतनीस पद भरतीसाठी कमाल वय मर्यादा वाढवणे, औसा येथे अतिरिक्त एमआयडीसीसाठी भूसंपादन करून जागा उपलब्ध करून
द्यावी तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना सहकारी बँकांकडूनही कर्ज घेता येईल अशी तरतूद करणे आदी संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची मुंबई येथे भेट घेतली. औसा शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव
अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असून सदरील प्रस्तावाला तातडीने मंजुरी प्रदान करावी तसेच औसा ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून सदरील रुग्णालयाचा बांधकामाच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी प्रदान आदीसह लातूर जिल्हा रुग्णालय मागच्या अनेक वर्षापासून कार्यान्वित नाही, जिल्हा रुग्णालयासाठी जागा निश्चित झालेली असून सदरील जागा ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालय
कार्यान्वित करण्यात यावे. औसा येथील आरोग्य विभागाचे हुडको अंतर्गत शासकीय निवासस्थान बांधण्यात यावे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. याबाबत मतदारसंघातील आरोग्य विभागाशी निगडित सर्व विषय मार्गी लावले जातील असा शब्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिला. आ. अभिमन्यू पवार यांनी राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन
औसा मतदारसंघात देवताला येथे देवी मंदिर देवस्थानाच्या जमिनीवर, कासार सिरसी येथे वन विभागाच्या जमिनीवर तसेच किल्लारी व लामजना येथे जुने गावठाण जमिनीवर वन उद्यान
विकसित करण्यासाठी प्रादेशिक वन पर्यटन अंतर्गत १६ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा