Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी प्रयत्नशील

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी प्रयत्नशील-खासदार सुधाकर शृंगारे-
 लातुरच्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी मेळावा- 






 (लातुर-प्रतिनिधी)    
 शेती आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, सिंचनाच्या दृष्टीने आता पासून रब्बी हंगामासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे , त्याच बरोबर लातुरसह मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे यासाठीब मराठवाडा वॉटर ग्रीड योजना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. ही महत्वकांक्षी योजना लवकरात लवकर कशी कार्यान्वित होईल या करिता आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे.खासदार सुधाकर शृंगारे हे लातुर शहरातल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. या शेतकरी मेळाव्याचे उदघाटन खासदार सुधाकर शृंगारे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर परभणी विद्यापीठाचे कृषी विस्तारक श्री अरुण गुट्टे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.एस.एस. डिग्रसे, सतीश बेद्रे, अंगद भोसले,संजय सोनकांबळे, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. -- 
या शेतकरी मेळाव्या दरम्यान पी एम किसान संमेलन आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रसारण उपस्थित शेतकऱ्यांनी पाहिले. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राबवीत असलेल्या अनेक योजनांची माहिती यावेळी खासदार सुधाकर शृंगारे यांनी उपस्थितांना दिली. वन नेशन वन फर्टिलायझर या नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याची माहितीही शेतकऱ्यांना यावेळी त्यांनी दिली. पुढे बोलताना खासदार सुधाकर शृंगारे यांनी मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे ,आता लातुर जिल्ह्याच्या सिंचनाच्या हेतूने रब्बी हंगामासाठी आता पासून नियोजन करण्यात यावे ,त्याच बरोबर लातुर शहराला आता दररोज पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने मनपाने प्रयत्न करावेत असे म्हटले आहे. मांजरा धरण आणि जिल्ह्यातील प्रकल्प आता भरलेले असले तरी वॉटर ग्रीड ही महत्वकांक्षी योजना ही मराठवाडा आणि लातुर जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी गरजेची आहे,त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. संततधार पावसाने जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यावरही खासदार शृंगारे यांनी या मेळाव्यात चिंता व्यक्त करीत एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही असे म्हंटले आहे.
Previous Post Next Post