लातूर वरून आठरा रेल्वे चालू तर आठ रेल्वे बंद
लातूरकरांवर होत असलेल्या अन्यायावर बुधवारी बैठक
लातूर :लातूरकरांनी अत्तापर्यंत पाणी,नळाला लागणारे मिटर,रेल्वे अशा विविध विषयांवर आंदोलने केली आहेत.त्यामध्ये रेल्वेचे आंदोलन लातूरकरांनी जवळून पाहिले आहे.पु़न्हा एकदा लातूरकरांच्या रेल्वे प्रश्नांवर आणि रेल्वेच्या संदर्भाने सरकारकडून लातूरकरांवर होत असलेल्या अन्यायावर लातूर रेल्वे संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे.लातूरच्या बंद झालेल्या रेल्वे पूर्ववत सुरू करणे, लातूर-मुंबई पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी २४ बोगींची रेल्वे सुरू करावी, लातूर- पुणे मंजूर इंटरसिटी चालू करावी,अशा विविध विषयांवर विचारविनिमय करुन आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वा. एमआयडीसी कॉर्नरजवळील रेसिडेन्सी क्लब येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर रेल्वे संघर्ष समितीने केले आहे.
लातूर वरून आठरा रेल्वे चालू असून आठ रेल्वे बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
पहा नेमके रेल्वे कोणत्या चालू आणि कोणत्या बंद
चालू असणार्या गाङया
1). पनवेल- नांदेड एक्स (दररोज) @
2)- मिरज परली. डेमो - 114/१८ दररोज)
3) मुंबई लातूर- (सोम. मंगल, बुध,शुक्र
4)- मुंबई बिहार एक्स, गुरु, शनि, रवि
5) पंढरपुर-निजामाबाद डेमो (दररोज)
6)- परली - मिरज डेमो (दररोज)
7). कोल्हापूर-नागपुर एकस (सोम, शुक्र
8)- हडपसर हैदाबाद एस (मंगळ, शुक्र, रवि)
9)- लातूर-मुंबई एस (सोम, मंगर, बुध, सुख
10)- बिहर· मुंबई एक्स (गुरु, शनि, रवि)
11) - नांदेड- पनवेल- (दररोज)
(12) - विजामाबाद - पंढरपुर डेमो (दररोज)
13) - हैद्राबाद- हडपसर (मंगल, शुक्र, रवि)
(14) - नागपुर- कोल्हापूर (रवि,
15) - धबबाद, कोल्हापूर (बुध)
16) - कोल्हापूर - धनबाद
(17) यशवंतपूर लातूर गुरु, शनि, रवि
18)- लातूर, यशवंतपूर (पास (गुरु, शक्ति, रवि)
चालू न झालेल्या गाड्या
1)कुर्ला- टर्मिनस एवा-बिहार एक्स (मंगळ)
2) - कुर्ला- नांदेड एक्स- (बुध)
3)-पुणे - आमरावती - (एक्स) (बुध)
4) आमरावती- पूर्ण (एम) - (मंगळ)
5) बिदर - कुर्ला टर्मिनस एक्स (बुध)
6). नांदेड - कुर्ला टर्मिनस एक्स (गुरु)
7). बिदर : कोल्हापुर (गुरु)
8) - कोल्हापूर - बिहर (गुरु)