गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
स्वत: सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या निट परिक्षेचा पेपर फोडल्याचा गौप्यस्पोट
रिलायन्स त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थाचालक उमाकांत होनराव यांच्या सांगण्यावरून केल्याचा गंभीर आरोप
लातूर- सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या निट परिक्षेचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला असुन या बाबत सांबदेव शंकरराव जोशी यांनी रिलायन्स त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थाचालक उमाकांत होनराव यांच्या सांगण्यावरुन स्वत: सांबदेव शंकरराव जोशी यांच्यासह ईतर कर्मचारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप गांधीचौक येथे हॉटेल रसिकावर पत्रकार परिषद घेवून करण्यात आला आहे.आरोग्य विभागाच्या पेपर फुटी नंतर आता निट परिक्षेचा पेपर फोडल्याचा गौप्यस्पोट करुन लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या माहिती नुसार सांबदेव शंकरराव जोशी, सध्या खाजगी नौकरी करत असून, ते रिलायन्स त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय लातूर या कॉलेजमध्ये दिनांक ०३/११/२०१८ ते दिनांक १३/११/२०२१ या कालावधीत नौकरीस
होते. इ.स. २०२१ च्या दिनांक १२/०९/२०२१ रोजी होणाऱ्या निट परिक्षेचे परिक्षा केंद्र रिलायन्स त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय लातूर हे होते. त्या परिक्षेत महाविद्यालय संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार उमाकांत होनराव यांच्याशी संगनमत करुन मी सांबदेव शंकरराव जोशी सदर परिक्षेचे पेपर फोडण्याचे काम संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार उमाकांत होनराव यांच्या जिवे मारण्याच्या धमक्याच्या दबावाखाली व भितीखाली केले आहे.
दिनांक १२/०९/२०२१ रोजी दुपारी २.०० ते ७.०० या वेळेत निटची परिक्षा होती. त्या दिवशी पर्यवेक्षक म्हणून माझी नियुक्ती सदर संस्थेच्या ३०५ या वर्गावर केली होती. परंतु संस्था चालक उमाकांत होनराव यांनी लगेच माझी नियुक्ती बदलून ३०३ या वर्गावर Isolation वर्गात देण्यात आली. संस्थाचालक उमाकांत होनराव च ओंकार होनराव यांच्या सांगण्यावरून पेपर २ वाजता चालु होताच ठिक २ वाजून ८ मिनीटांनी प्रश्न पत्रिकेचे फोटो मी माझ्या व चव्हाण मॅडमच्या मोबाईलमध्ये काढले, माझ्या मोबाईलमध्ये प्रश्न पत्रिकेचे २४ फोटो व चव्हाण मॅडम यांच्या मोबाईलमध्ये प्रश्न पत्रिकेचे १८ फोटो काढुन मी लगेच फोटो मोबाईलसह ते ओंकार होनराव यांना नेऊन दिले. मी मोबाईल ओंकार होनराव यांना देताना ते केतकी हॉस्टेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले आहेत, त्यासाठी केतकी
हॉस्टेलचे त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे व या पेपरफोडीच्या प्रकरणासाठी इस्लामपूर येथून चार शिक्षक व बेळगाव येथून तीन शिक्षक बोलावण्यात आलेले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था ही संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार होनराव यांनी ज्ञानेश्वरी हॉस्टेल, काशि हॉस्टेल व पंचशिल हॉस्टेल येथे केलेली होती, हे सर्व शिक्षक दि. ११/०९/२०२१ रोजी रात्री ११.०० वाजता लातूर मध्ये वर नमुद हॉस्टेलवर आलेले होते. महाविद्यालयाच्या वस्तीगृह व मेस विभागात प्रत्येक खोलीमध्ये त्या शिक्षकांना बसविण्यात आले व फोटो काढलेल्या प्रश्नपत्रिका त्यांच्याजवळ पोहचविण्यात आल्या, परिक्षेच्या दिवशी ठिक ४.३० ते ४.४५ च्या दरम्यान ओंकार होनराव यांनी माझ्यासमक्ष त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे असलेले कागद संगमेश्वर होनराव यांना दिली व त्यांनी ती उत्तरे असलेले कागद त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुरवले. सदरचा झालेला प्रकार सुध्दा सदर संस्थेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास स्पष्टपणे दिसून येईल.
सदर पेपरफुटीच्या गैर कारभारात माझ्यासह संगमेश्वर होनराव, हणमंत गड्डीमे, दिपक होनराव, पुरी सर, धुमाळ रामराजे, शेख सर, किरण आलुरे, श्रीकृष्ण जाधव सर, कुलकर्णी, पियुषसिंग गोयल रा. इस्लामपूर व इतर अज्ञात बेळगांवचे चार शिक्षक यांचा समावेश आहे. सदर प्रकारानंतर मला माझे एअरटेल कंपनीचे सिमकार्ड ओंकार होनराव यांनी तोडण्यास भाग पाडले व त्याचदिवशी मी दुसरे सिम कार्ड घेतले हे ही तपासाअंती निष्पन्न होईल. सदरचा झालेला सर्व गैरप्रकार हा सदर संस्थेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला असून, त्या परिक्षेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजल्यापासून सायंकाळच्या ५.३० पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. सदर झालेल्या गैरप्रकाराची मी प्रशासन व प्रसारमाध्यमा समोर केल्यास मला जिवे मारण्याची धमकी संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार उमाकांत होनराव हे सतत देत आहेत. तसेच सतत मानसिक त्रास देत आहेत. सदरील गैरप्रकारात मी सुंदर संस्थेतील नोकरीसाठी व पोटा पाण्यासाठी व संस्थाचालकाच्या जिवे मारण्याच्या धमकीस घाबरुन सामील झालो होतो, याचे मला अत्यंत दुःख आहे व माझ्या हातून पडलेले हे पाप याचा मला अत्यंत पश्चाताप होत आहे..
सदर रिलायन्स त्रिपुरा याचे संस्थाचालक उमाकांत होनराय व त्यांचा मुलगा ओंकार उमाकांत होनराव हे अत्यंत गुंड व अडदांड प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्याकडे मुबलक मनुष्यबळ व पैशाचे बळ आहे. मी सदर प्रकरण उघडकीस आणल्यामुळे त्यांचेपासून माझ्या जिवाला व माझ्या परिवारास धोका निर्माण झालेला आहे. माझ्या च माझ्या कुटूंबियांचे भविष्यात जिंवाचे कांही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी संस्था चालक उमाकांत होनराव व त्यांचा मुलगा ओंकारउमाकांत होनराव यांना जबाबदार व दोषी समजण्यात यावे.
याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक तसेच मुख्य संयोजक, NTA NEET] गौतम बुद्ध नगर, ITK ऑटरिच सेंटर, नोयडा यांना निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.