गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
नांदेड़-संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणार्या नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रटरणात शार्प शूटरला अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. संजय बियाणी खून प्रकरणात नांदेड एसआयटीने आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली असून, दिव्यांश हा १४ वा आरोपी आहे. या १३ आरोपीविरोधात शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी नांदेडमधील विशेष मोक्का न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
संजय बियाणी हत्याप्रकरणात गाडीवर येवून गोळया झाडणार्या शूटरला अटक
दिल्ली सेलची गुजरातमध्ये कारवाई : वाहन चालवीत झाडल्या होत्या गोळ्या
![]() |
दिव्यांश पिता रामचेत (२३)-शुटर |
नांदेड़-संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणार्या नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रटरणात शार्प शूटरला अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. संजय बियाणी खून प्रकरणात नांदेड एसआयटीने आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली असून, दिव्यांश हा १४ वा आरोपी आहे. या १३ आरोपीविरोधात शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी नांदेडमधील विशेष मोक्का न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन सेलने यश मिळवले आहे.. गुरुवारी रात्री गुजरात राज्यात ही अटक झाली दिव्यांश पिता रामचेत (२३). रा.पुराबाजार, ता. जि. अयोध्या, उत्तर प्रदेश, असे या शूटरचे नाव आहे. नांदेडात ५ एप्रिल २०२२ रोजी संजय बियाणी यांची त्यांच्या येथील राहत्या घरासमोर भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळ्या झाडणाऱ्या दोन शूटर्सपैकी एक दिव्यांशू हा आहे. घटनेच्या वेळी तो गाडी चालवीत होता, त्याने स्वतःबियाणींवर आपल्या रिव्हॉल्व्हरमधून पहिली गोळी झाडली. एवढेच नव्हे तर बियाणी खाली पडल्यानंतरही त्यांच्यावर दोन्ही शूटर्सने पुन्हा गोळया झाडल्या
आंतरराष्ट्रीय दहशतवादी व सध्या पाकिस्तानात दडून असल्याचा संशय असलेला कुख्यात रिंदा हा बियाणी यांच्या खुनाचा मास्टरमाइंड आहे. त्यालाही आरोपी बनविण्यात आले आहे.
अनेक तपास संस्था शूटर्सच्या मागावर
महाराष्ट्रातील एटीएस, नांदेड जिल्हा पोलीस दलाचे विशेष तपास पथक (एसआयटी), दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, स्पेशल टास्क फोर्स, इन्टेलिजन्स ब्युरो, एनआयए आदी राज्य व संस्था या शूटर्सच्या मागावर होत्या. अखेर दिल्ली पोलिसांना त्यात यश आले
Tags:
Crime News