'लातूररत्न' पुरस्काराने 'माझं लातूर' परिवार सन्मानित...
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
लातूर : लातूरच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माझं लातूर परिवारास सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात *लातूररत्न* पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सप्तफेरेच्या दशकपूर्ती निमित्त स्वानंद मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, गुरुनाथ मगे, संजय राजुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माझं लातूर परिवाराच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या विविध दिशादर्शक आणि समाजपयोगी उपक्रमांची दखल घेत सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार समितीने ही निवड केली असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर असलेला अराजकीय सामाजिक परिवार म्हणून माझं लातूर परिवाराची ओळख निर्माण झाली आहे. लातूरकरांनी दाखवलेला विश्वास कायम ठेवत यापुढील काळातही माझं लातूर परिवार निस्वार्थपणे आणि जबाबदारीपूर्वक आपले सामाजिक कर्तव्य पार पाडेल अशी ग्वाही माझं लातूर परिवाराच्या वतीने सतीश तांदळे यांनी दिली. याप्रसंगी डॉ.सचिन बालकुंदे, डॉ.बालाजी सोळुंके, महेन्द्र जोंधळे, अभय मिरजकर, शशिकांत पाटील, तम्मा पावले, काशिनाथ बळवंते, प्रमोद गुडे, रत्नाकर निलंगेकर, मासूम खान, काकासाहेब शिंदे, श्रीराम जाधव, प्रशांत मुसळे, कृष्णा देशमुख, प्रा. पंचशिला डावकर, अमर करकरे, विष्णू आष्टीकर, अमोल घायाळ, नितीन भाले, नितीन हांडे, रविकिरण सूर्यवंशी, दत्तात्रय परळकर, सोमनाथ मेदगे यांची उपस्थिती होती.