Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रेणापूर पोलिसांनी पकडला २१ लाखांचा गुटखा ; चालकासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रेणापूर पोलिसांनी पकडला २१ लाखांचा गुटखा ; चालकासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल


रेणापूर : रेणापूरहून पानगावकडे जात असलेल्या कंटेनरमधुन तब्बल २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पानगाव परिसरात करण्यात आली. या प्रकरणी चालकासह दोघांविरुध्द रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणापूर पोलीस यांना गोपनीय बातमीदारामार्फ माहिती मिळाली की, एम.एच. १४ जी. डी. ४१५० या कंटेनरमधून रेणापूर पानगाव मार्गावरून धर्मापुरीकडे अवैध गुटखा घेवुन जात असल्याची माहिती मिळाली. रेणापूर पोलीसानी पानगावपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे फाटका जवळ सापळा लावला. अवैध गुटखा घेवुन जाणाऱ्या कंटेनर थांबून वाहन चालकाची चौकशी करण्यात आली. अधिकची चौकशी केली असता कंटेनर चालकाने वाहनात गुटखा
असल्याचे सांगितले त्यावरून पोलीसांनी कंटेनर तपासणी केली असता त्यामध्ये राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचे पांढरे पोतेत्यामध्ये गोवा नावाचे सुगंधीत गुटख आढळून आले.पोत्यात ६ बॅग असलेले एकूण १२६ बॅग ज्यांची किंमत १३ हजार रुपयाप्रमाणे १६ लाख ३८हजार रुपये, तसेच वजीर नावाच्या गुटख्याचे   एकूण १० मोठे पोते ज्यामध्ये प्रत्येक पोत्यात ६ बॅग असे एकूण ६० बॅग ज्यांची बॅगची किंमत ८ हजार रुपयांप्रमाणे ४ लाख ८० हजार असा एकूण २१ लाख १८ हजार  रुपये किंमतीचा गुटखा तसेच वाहतुकीसाठी कंटेनर ताब्यात घेवुन रेणापूर पोलीस ठाण्यात चालक व अन्य एकाविरुध्द रेणापूर वापरलेला कंटेनर लाख रुपये असा एकुण ३९ लाख १८ हजार आहे. रुपयांचा मुद्देमाल रेणापूर पोलीसांनी जप्त केला.  
पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर  पोलीस अधिक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस लावुन महाराष्ट्र अधिक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 
रेणापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भंडेयांच्या नेतृत्वात पोलीस जमादार बाळासाहेब कन्हेरे, गौतम घाडगे, किरण गंभिरे,   बुधोडकर, परमेश्वर शेळगे, नामदेव सारूळे,  आनंद कांबळे, अनिल मोगले, बालाजी झोडपे  या पोलीसाच्या पथकाने कार्यवाही केली. व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अन्न अधिकारी व्ही.एस. लोढे यांनी दिलेल्या प्रत्येक फिर्यादीवरून गुरंन ३४५ / २२ कलम ३२८,  २७२, २७३, १८८, ३४ भादवि, अन्न सुरक्षा  व मानदेकायदा २००६ चे कलम ५९ नुसार  एकूण २१ लाख १८ हजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भंडे हे करीत आहेत.
Previous Post Next Post