प्राॅपर्टी एक्स्पो ला लागली घर-घर..उद्घाटना दिवशीच स्थानिक आमदारांनी फिरवली पाठ
लातूर-शुक्रवारी अगदी थाटा माटात या प्राॅपर्टी एक्स्पो चे उद्घाटन सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचा मुख्य हेतू हे नागरिकांनी यावे असा होता परंतू हा एक्सपो हा ठरावाविक एका पक्षाचा दिसत असल्याने स्थानिक आमदारांनी याकडे पाठ फिरवल्याचे सांगीतले जात होते,मोठ मोठ्या जाहिरातीवर औस्याच्या आमदारांचा फोटो झळकत होता परंतू त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसले मग कसेबसे विधिनपरिषदेचे आमदार आणि अभिनेते यांनी होणारी नाचक्की टाळली आणी उद्घाटन करुन ते निघून गेले.लाखों रूपये खर्चुन शहरातील नामवंत व या कार्यक्रमाचे अति हुशार बिल्डरांचे अध्यक्ष मात्र सपशेल तोंडघशी पडले आहेत.त्यामुळे दुसर्यादिवशीही या एक्सपो ला मनावा तसा नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे सांगण्यात येत होते.बरेचशे स्टाॅल मध्ये माहिती देण्यासही कोणी उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत होते.लातूर शहराची हद्द वाढ झाली असल्यामुळे रिकाम्या प्लाॅटचे दर शाशकिय रेडी रेकनरनुसार मिनिमम १०००रू स्क्वेअर फुट असल्याचे सांगीतले जात आहे,त्यामुळे साधा १००० स्क्वेअर फुट चा प्लाॅट घ्यायचा असल्यास किमान १०लाख रुपये लागतात त्यामुळे सध्या लातूर शहरामध्ये प्राॅपर्टी घेणे अवघड असल्याचे मत सर्वसामा़न्यांकडून व्यक्त होत आहे.परंतू परंतू या प्राॅपर्टी एक्स्पो मध्ये सर्वात कमी दरांमध्ये फ्लॅट देण्याचे सांगीतले जात असले तरी तो फ्लॅट चे लोकेशन मात्र नागरिकांना पटत नसल्याचे बोलले जात आहे.यातील काही बिल्डरांचे फ्लैट चे लोकेशन हे पुणे मुंबई असल्यामुळे त्याकडेही नागरिकांनी म्हणावे तसे पाहिले नसल्याचे समझते.एकंदरितच या प्राॅपर्टी एक्स्पो ला घर-घर..लागल्याचे दिसुन आले.