आनंदाच्या या दिवाळीत प्रत्येकाने
एक झाड लावून पर्यावरणाचे संवर्धन करावे
-आमदार अमित विलासराव देशमुख
अष्टविनायक प्रतिष्ठानद्वारा आयोजित दिवाळी पहाट संगीत समारोह
कार्यक्रमाचा माजी मंत्री, आमदार देशमुख यांनी घेतला स्वरानंद उपस्थितांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी २४ आक्टोंबर २२ :
लातूर येथील अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट संगीत समारोह
कार्यक्रमातील सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे यांच्या सुमधुर गायनाचा राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ.अदिती अमित देशमुख सहपरिवार उपस्थित राहून स्वरानंद घेतला.
सोमवार दि. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त पहाटे लातूर शहरातील अष्टविनायक प्रतिष्ठान लातूरद्वारा दिवाळी पहाट कार्यक्रमात सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे यांच्या सुमधुर गायनाच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित राहून स्वरानंद घेतला. उपस्थित सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने ३०० फुलांच्या रोपांचे शहरातील नागरिकांना वाटप करून आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी पद्मविभूषण डॉ. अशोक कुकडे, आकाश राठी, लातूर अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे, संचालिका शुभदा रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी मशायक वाय.एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत भंडारी, अष्टविनायक प्रतिष्ठान लातूरचे सचिव राजेश लाठी, डॉ.दिनकर काळे, डॉ. हंसराज बाहेती, डॉ.सुरेखा काळे, दिलीप माने, नरेश सुर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप ननंदकर, ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे पवन लड्डा, इमरान सय्यद आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने ३०० जास्वंदाच्या फुलांच्या वृक्षांचे शहरातील नागरिकांना वाटप करण्यात आले. लाडू, चिवडा करंजी फराळा सोबत ही दिवाळी एक झाड लावून पर्यावरणाचे संवर्धन करून साजरी करावी असे आवाहनही यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीन त्यांनी केले.