दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा..
विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी
लातूर प्रतिनिधी २३ आक्टोंबर २२ :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यावेळी भेटलेले पदाधिकारी व कार्येकर्ते आणि उपस्थित सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, टवेन्टिवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विलास सहकारी साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे, व्हा. चेअरमन श्याम भोसले, माजी महापौर दीपक सूळ, समद पटेल, धनंजय देशमुख, रविशंकर जाधव, अभय साळुंके, दिलीप माने, प्रवीण सूर्यवंशी, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद, दत्ता सोमवंशी, प्रवीण पाटील बालाजी वाघमारे, उपसरपंच गोविंद देशमुख, पप्पू देशमुख, सचिन मस्के, विलास भोसले, आबासाहेब पाटील उजेडकर, धनंजय शेळके, डॉ.अरविंद भातांबरे, सिकंदर पटेल, प्रा.प्रवीण कांबळे, दगडूसाहेब पडीले, मोहन सुरवसे, इसरार सगरे, आयुब मणियार, संजय निलेगावकर, शरद देशमुख, पत्रकार हरिचंद्र जाधव, भालचंद्र येडवे, पुष्कराज खुबा, सचिन दाताळ, विजय टाकेकर, किरण बनसोडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
स्वाती जाधव यांचे केले अभिनंदन
स्वाती जाधव यांची रोजगार व स्वयंरोजगार
विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी स्वाती जाधव यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, यावेळी आमदार देशमुख यांनी स्वाती जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.