पोलीस स्मृतिदिना निमित्त लातूर पोलीस मुख्यालयात शहिदांना मानवंदना....
लातूर- यावर्षी देशभरात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली. लातूर पोलीस विभागातर्फे या शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त मानवंदना अर्पण करण्यात आली. पोलीस मुख्यालय, बाभळगाव येथील पोलीस परेड ग्राऊंडवरील आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्मृती स्तंभाजवळ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतिदिन पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी पोलीस हौतात्म्य दिनाचे महत्त्व विशद केले.
यावेळी मा. जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिनव गोयल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगावचे प्राचार्य श्री. कलबुर्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम, पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथील उपप्राचार्य श्री.सुधीर खीरडकर उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्री. सुडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक महेश काळे, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे , राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री.दिलीप माने प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी या वर्षभरात देशभरात शहीद झालेल्या सर्व शहीद पोलिसांच्या नावांचे वाचन करण्यात आले. आणि बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली...