Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पावसामुळे 'CRIDAI' वाल्यांची उडाली तारांबळ..

पावसामुळे 'CRIDAI' वाल्यांची उडाली तारांबळ..
 लातूरकरांना स्वप्नांचे घर देणार्यांच्या, स्वप्नांवर.. फेरले पाणी!





लातूर-लातूर मध्ये मोठ्या गाजावाजा करत लातूरकरांच्या स्वप्नांतील घरे विकणार्यांची अचानक पडलेल्या धुवांधार पावसामुळे 'CRIDAI' वाल्यांची तारांबळ उडाली.२५०००स्क्वेअर फुटावर उभारलेला भव्य मंडप अक्षरश: जागोजागी गळत असल्याचे चित्र दिसत होते.लाखोंरुपये खर्च करून उभारलेला भव्य मंडप पावसाचा अंदाज धरुन उभारला असला तरी मात्र धुवांधार पावसामुळे तो तग धरू शकला नाही.विशेष म्हणजे मंडपाच्या आतील बाजूस उभारलेल्या स्टाॅल मध्ये सुध्दा पाणी गळत असल्याचे चित्र दिसत होते.पाण्यामुळे कारपेट ओले झाले होते .एकंदरीतच लातूरकरांना स्वप्नांचे घर देणार्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या सारखे वाटत होते..भव्यमंडप चारी बाजूने बंदिस्त असल्यामुळे व्हेंटीलेशनचाही अभाव असल्याचे दिसत होते.अचानक पावसामुळे काही विपरित घटना घडली तर आगीच्या दुर्घटनांबाबत उपाययोजनांचा भाग म्हणून अग्निसुरक्षेची कोणतीही उपाययोजना अथवा अग्निशामन यंत्र मात्र दिसले नाही या विषयावर महानगरपालिकेने गांभीर्याने पाहण्याची अवश्यकता असुन भव्य मंडपाची अग्निशामक विभागातर्फे तपासणी करुन पाहणी करने अवश्यक बनले आहे. येणार्या लातूरकरांचा जीव हा अतिशय अमुल्य असुुन, कुठलीही विपरित घटना घडू नये या साठी तपासणी होणे अवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते.
Previous Post Next Post