Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

देशी दारू व वाहनासह 04 लाख 77 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत..

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
 देशी दारू व वाहनासह 04 लाख 77 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत..

       उदगीर-       पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
                त्या अनुषंगाने उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डॅनियल बेन यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आले होते. पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीतून विनापास परवाना देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्यासाठी देशीदारूची वाहतूक होणार आहे.अशी माहिती मिळाल्याने पोलीस ठाण्याच्या पथकाने लोणी मोड रस्त्यावर सापळा लावला थोड्याच वेळात मिळालेल्या बातमी नुसार एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गाडी क्रमांक एम.एच.23 ई-8814 अशी रोडने येताना दिसली.पथकाने सदर टाटा सुमोला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे वेगवेगळ्या कंपनीचे 1156 दारूच्या बाटल्या मिळून आल्या.
               त्यावरून देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे 

1)संदीप वैजनाथ शिंदे वय 27 वर्ष राहणार लोहारा तालुका उदगीर.

2) प्रशांत काशिनाथ पाटील राहणार तीवटघ्याळ पाटी,उदगीर.

 यांचे विरोधात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरनं 510/2022 कलम कलम 65(अ)(ई),83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संतोष शिंदे हे करत आहेत.
             सदरची कारवाई पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. दीपक कुमार वाघमारे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, संभाजी गाडगे, अभिजीत लोखंडे यांनी केली आहे.
Previous Post Next Post