गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 (पोस्को) अन्वये आरोपीला 3 वर्ष कारावास व 1 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा.
अतिरिक्त सत्र न्यायालय,लातूर यांचा निकाल.
लातूर- दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील नळेगाव येथील एका अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग केल्याच्या घटनेवरून पोलीस ठाणे चाकूर येथे इसम नामे रहीम इब्राहिम तांबोळी, (शेख) वय 38 वर्ष, धंदा मजुरी, राहणार नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. याचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 438/2020 कलम 354,(A) 452,506 भादवी व 7, 8, 9(क), 10 लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी तात्काळ सदर गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करून गुन्ह्यात आरोपीला अटक केली होती. वरिष्ठांचे मार्गदर्शनात पुढील तपास सुरू ठेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने पंचनामा, प्रत्यक्ष साक्षीदार व इतर भौतिक पुराव्यांची जोडणी करून, भक्कम पुरावे गोळा करून नमूद आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
त्यावरून अतिरिक्त न्यायाधीश, लातूर बी.सी.कांबळे यांनी नमूद गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी मिळवलेले व दोषारोपत्रा सोबत जोडलेले पस्थितीजन्य, भौतिक व भक्कम पुरावे तसेच तपास अधिकारी, पंच, प्रत्यक्ष साक्षीदार, यांच्या महत्त्वाच्या साक्षी वरून दिनांक 21/11/ 2022 रोजी नमूद आरोपीस तीन वर्ष कारावास व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
तत्कालीन तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक नीलम घोरपडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास करून, मुदतीत तपास करून भक्कम पुरावे जमा करून मा.न्यायालयात हजर केल्याने तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी केलेल्या युक्तिवादावरून मा.न्यायालयाने सदर आरोपीस शिक्षा सुनावली आहे.
नमूद गुन्ह्यात पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते , कोर्ट ट्रायल मॉनिटरिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, कोर्ट पैरवी अमलदार चंद्रकांत राचमाले यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.