Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दमदाटी करून जबरीने मोबाईल हिसकावणाऱ्या आणखीन 3 आरोपींना अटक.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
दमदाटी करून जबरीने मोबाईल हिसकावणाऱ्या आणखीन 3 आरोपींना अटक
मोबाईलफोन व मोटारसायकलसह 5 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.



       लातूर-      याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पाठीमागून येऊन दमदाटी करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या व पोलिस ठाणे शिवाजी चौक येथे दाखल झालेल्या 2 जबरी चोरीचे गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी आढावा घेऊन सदरचे गुन्हे उघडकिस आणण्याकरिता सूचना करून मार्गदर्शन केले होते.
            त्या अनुषंगाने गुन्हा उघडकीस आणण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर व एमआयडीसीचे संयुक्त पथक तयार करून सदर तपास पथकाद्वारे गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या गुन्हे तपास पथकातील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहिती मधील ठिकाणी पोलीस पथक पोहोचले.व गुन्ह्यातील संशयित आरोपींना लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे

1) प्रफुल प्रकाश पवार,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर.

2) विशाल विष्णू जाधव, वय 26 वर्ष, राहणार पंचवटी नगर,लातूर.
 
3) महेश नामदेवराव नरहारे, वय 20 वर्ष, राहणार महाळग्रा, तालुका चाकूर जिल्हा लातूर.

               असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे नमूद गुन्हे संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी शहरातील विविध भागातून नागरिकाकडील मोबाईल जबरदस्तीने, दमदाटी करून हिसकावून घेऊन जबरीचोरी केल्याचे कबूल करून चोरलेले विविध कंपनीचे एकूण 22 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल हजर केली. ते जप्त करून आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
              तीन दिवसांपूर्वीच पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या पथकाने मोबाईल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल व मोटारसायकल असा 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. शिवाजीनगरच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे मोबाईल हिसकावण्याच्या दोन गुन्ह्याचा उलगडा होऊन आरोपींना अटक करण्यात आल्यामुळे मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीवर नक्कीच जरब बसणार आहे.
               गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजी चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड हे करीत आहेत.
                सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात,पोलीस ठाणे शिवाजी चौकचे पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे व पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार युवराज गिरी, गोविंद चामे, काकासाहेब बोचरे, पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस अंमलदार सिद्धेश्वर मदने, निलेश जाधव यांनी केली आहे.
Previous Post Next Post