Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी उकरून विटंबना करणाऱ्यांवर आणि 'त्या'व्हायरल व्हिडिओची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा !

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
 डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी उकरून विटंबना करणाऱ्यांवर आणि 'त्या'व्हायरल व्हिडिओची चौकशी करून कायदेशीर कारवाई करा ! 

लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भक्तीस्थळाच्या ट्रस्टींची मागणी 


लातूर : अहमदपूर जवळील भक्ती स्थळ इथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी उकरून पवित्र स्मृतीची विटंबना केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे असे कृत्य करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी भक्ती स्थळाच्या ट्रस्टींनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे. याशिवाय महाराजांच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होत असून त्या व्हिडिओची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. 

   अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळावरील समाधी विटंबनेवरून मोठा वाद पुन्हा एकदा निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर भक्ती स्थळ मूळ ट्रस्ट असलेल्या ट्रस्टींची पत्रकार परिषद लातूरमध्ये पार पडली. ज्यात महाराजांच्या समाधीची विटंबना करणाऱ्यांवर तसेच महाराजांचा चल करणाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी अध्यक्ष माधवराव बरगे, सुभाष सराफ, बब्रुवान हैबतपुरे, व्यंकटरव मुद्दे, शंकर मोरगे आणि संदीप डाकुलगे यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. 
  
  दोन वर्षांपूर्वी ०२ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना देवाज्ञा झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी शासकिय ईतमामात करण्यात आला. यावेळी लातूर-नांदेडचे जिल्हाधिकारी तसेच अनेक जगद्गुरूंच्या उपस्थितीत विधिवत अंत्यविधी करण्यात आला होता. मात्र समाधी मंदिराच्या बांधकामाच्या नावावर ०४ फुटावर महाराजांचा देह असलेली पंचधातूची पेटी काढून ही विटंबना करण्यात आली आहे. समाधीस्थळावर १५ फूट खोल खड्डा करून पंचधातूची पेटी काढताना त्या अज्ञातांनी समाजाशी, जगद्गुरूंची, विश्वस्त मंडळाशी किंवा प्रशासनाशी संपर्क का केला नाही ? लातूर व नांदेडचे जिल्हाधीकारी, लिंगायत धर्मगुरुंच्या उपस्थितीत विधीवत अंत्यविधी झाल्यानंतर समाधी का उकरण्यात आली ? यावेळी समाजाची व स्थानिक प्रशासनाची परवानगी काढली होती का? ०४ फुटावरील महाराजांचा देह असताना १५ फुट खड्डा का खोदला ? अशा पद्धतीने समाधी उकरणे हा गुन्हा नाही का? असे एक ना अनेक सवाल यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव बरगे इतरही ट्रस्टींनी उपस्थित केले. त्यामुळे असे बेकायदा कृत्य करून महाराजांच्या पवित्र स्मृतींची विटंबना करणा-याविरोधात कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे आहे. याविषयी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्यानंतर समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सध्या काही जणांकडून सुरू आहे. तसेच विश्वस्त मंडळाची सुद्धा नाहक बदनामी करणे सुरु आहे. आमची ट्रस्टची नोंद ही धर्मादाय कार्यालयात असून त्यांच्या ट्रस्टची कसलीही नोंद धर्मादाय कार्यालयात नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

 याशिवाय राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना देवाज्ञा होण्यापुर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयातून व्हायरल होत आहे. ज्यात महाराजांनी स्पष्ट म्हटलं आहे की, “मला खरा त्रास झालाय तो विश्वंभर आणि बदक यांच्या कडून मी आणखीनही काही दिवस राहाणार होतो. असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्या व्हिडीओत महाराजांनी ज्या “विश्वंभर आणि बदक" ही दोन नावे घेतली आहेत. त्या दोघांची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. कारण या दोघांच्या त्रासामुळेच महराजांचा मृत्यु झालाय का ? या दोघांनी महाराजांचा छळ केलाय का ? कुठल्या कारणासाठी हा छळ करण्यात आला? महाराजांच्या प्रॉपर्टी वर या दोघांची नजर होती का ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या व्हिडीओची निःपक्षपणे चौकशी करून संबंधीतांवर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी आम्हा सर्वांची ईच्छा असल्याचे निवेदनही लातूर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे सदर निवेदनावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. या निवेदनावर अध्यक्ष माधवराव बरगे, सुभाष सराफ, बब्रुवान हैबतपुरे, व्यंकटरव मुद्दे, शंकर मोरगे आणि संदीप डाकुलगे यांच्या सह्या आहेत.
Previous Post Next Post