गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
सॉलव्हन्सी प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन हजार ची लाच घेताना सहाय्यक लिपिक जाऴयात
उदगीर
तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जावरून तक्रारदार यांचे भाऊजी वर गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्ह्यात तक्रारदारांचे भाऊजी च्या जामीना करीता सॉलव्हन्सी प्रमाणपत्र लागणार असल्याने, त्यांचे वडील निवृती गायकवाड यांचे नावे सॉलव्हन्सी काढण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला असता आरोपी प्रशांत अंबादासराव चव्हाण, वय 48 वर्ष, पद - महसूल सहायक (लिपिक), नेमणूक- तहसिल कार्यालय, उदगीर ता.उदगीर, जि.लातूर यांनी सॉलव्हन्सी (ऐपतदारी प्रमाणपत्र) काढून देण्याच्या कामासाठी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 2,000/- रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेली लाचेची 2,000/- रु. रक्कम देण्यासाठी तहसिल कार्यालय, उदगीर येथील महसूल विभाग येथे गेले असता आरोपी प्रशांत अंबादासराव चव्हाण यांनी स्वतः चे कार्यालयात पंचासमक्ष लाचेची रक्कम स्विकारली. आरोपी ला ताब्यात घेण्यात आले असून सदर बाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
श्री. धरमसिंग चव्हाण,अपर पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
➡ *पर्यवेक्षण अधिकारी:-*
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. लातूर.
➡ *सापळा पथक:-*
अन्वर मुजावर व भास्कर पुल्ली, पोलीस
निरीक्षक ला.प्र.वि. लातूर आणि ला.प्र.वि. लातूर
टीम
➡ *तपास अधिकारी:-*
अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि.लातूर
-----------------------------------------------------------
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर - 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. लातुर
मोबाईल नंबर - 09309348184
ला.प्र.वि.लातूर कार्यालय दुरध्वनी - 02382-242674
@ टोल फ्रि क्रं. 1064