विजय राजुरे यांची मनपाच्या बी झोन व निवडणूक विभाग प्रमुखपदी नियुक्ति
लातूर : अतिशय मनमिळावू , लोकांमध्ये मिसळून काम करणारे,सदैव सर्वसामान्य नागरिकांच्या कामांसाठी धावून जाणारे असे कर्तव्य निष्ठ अधिकारी म्हणुन ओळख असणारे भांडार विभागाचे अधीक्षक विजय राजुरे यांची बदली बी झोनचे क्षेत्रीय अधिकारी व निवडणूक विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्तीपदी नूतन आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केली आहे. आयुक्त मनोहरे यांनी १ नोव्हेंबर रोजी याबाबतचा आदेश काढला. असून, या आदेशात आणखी दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. आस्थापना विभागाचे अधीक्षक नंदकिशोर तापडे यांच्याकडे जीपीएफ व अंशदान निवृत्ती वेतन विभाग प्रमुख म्हणून काम दिले आहे, तर अग्निशमन विभागातील फायरमन सुभाष कदम यांना अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.