Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बालकांनो घाबरू नका डायल करा १०९८ !

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बालकांनो घाबरू नका डायल करा १०९८ !


लातूर : लातूर शहरामध्ये एम एस आय डी सी भागात असलेल्या किर्ति दालमिल वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने धाड टाकून जोखीमच्या ठिकाणी कामावर असलेल्या चार बालकामगारांची सुटका करण्यात आली तसेच त्या मुलांना कामावर लावणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मुलांना अशा प्रकारचे कामे लावून त्यांच्या जिवितांशी आणि भविष्यासोबत हे दालमिल मालक आणि ठेकेदार करत आहेत त्यामुळे अशा घटनेत मालकांवरही गुन्हानोंद होणे अवश्यक आहे परंतू या घटनेत मात्र तसे झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 दि.१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत बालहक्क सप्ताह राबविण्यात आला असून, चाइल्डलाइनच्या वतीने दोस्ती चाइल्डलाइनशी हा उपक्रम राबविण्यात आला. बालक कोणी अडचणीत असेल तर१०९८या टोल फ्रीवर डायल करून संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

चाइल्डलाइनच्या वतीने विविध शासकीय बालसप्ताहानिमित्त कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात आली. अनाथ मुले, शाळाबाह्य मुले व त्यांच्या हक्काबाबत या सप्ताहानिमित्त जनजागृती केली.

CHILD LINE 1098 NIGHT & DAY

• १०९८ या टोल फ्री क्रमांकावरून कोणती मदत मिळते याबाबतही जनजागृती करण्यात आली. अडचणीत असलेल्या बालकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांची समस्या जाणून घेतली जाते.

बालकांनो घाबरू नका...डायल करा १०९८
Previous Post Next Post