गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रेणापूर गुटखा प्रकरणात नवे वळण..गुटख्याचे पोते मध्येच गायब ?
नविन पोलिस अधिक्षक यांना गुटख्याची सलामी!
लातूर-रेणापूरहून पानगावकडे जात असलेल्या कंटेनरमधुन तब्बल २१ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले होते. ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पानगाव परिसरात करण्यात आली होती. या प्रकरणी चालकासह दोघांविरुध्द रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला खरा परंतू या प्रकरणात आता वेगळेच वळण लागले आहे.पकडण्यात आलेल्या गुटख्याच्या पोत्यातून काही पोते कार्यवाही करण्याच्या आधीच गायब करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.या गुटख्याच्या पोत्याची किंमत तब्बल चार लाख रुपये असल्याचे समोर येत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. याबाबत संपुर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा होवू लागली आहे.
मिळालेल्या माहिती वरुन , एम.एच. १४ जी. डी. ४१५० या कंटेनरमधून रेणापूर पानगाव मार्गावरून धर्मापुरीकडे अवैध गुटखा घेवुन जात असल्याने रेणापूर पोलीसानी पानगावपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे फाटका जवळ सापळा लावला. अवैध गुटखा घेवुन जाणाऱ्या कंटेनर थांबून वाहन चालकाची चौकशी करण्यात आली. अधिकची चौकशी केली असता कंटेनर चालकाने वाहनात गुटखा असल्याचे सांगितले त्यावरून लगेच पोलीसांनी कंटेनर तपासणी न करता अन्न औषध प्रशाशन विभागाला कळवले त्यांना येण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात या गुटख्याच्या पोत्याची हेरा-फेरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.नियमानुसा कार्यवाही करण्यात आल्याचे दर्शिविले असले तरी नियम डावलून हा सर्व प्रकार घडला असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.विशेष म्हणजे यामध्ये काही कर्मचार्यांचाही हात असल्याचे बोलले जात आहे.याहून गंभीर बाब म्हणजे पोलिसांना जप्ती पंचनामा करण्याचा अधिकार नसून,जप्ती पंचनाम्याचा अधिकार हा फक्त अन्न औषध प्रशाशनास आहे,परंतू या नियमाची सर्रास पायमल्ली होताना समोर येत आहे. त्यामुळे आता नव्याने रुजु झालेल्या पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांना गुटख्याची सलामी तर नाही ना..?अशी जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये होवू लागली आहे.आता नेमके या प्रकरणांमध्ये कोण कोण कर्मचारी आहेत हे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी चौकशी करणे अवश्यक बनले आहे. पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी गडचिरोली येथे आतिशय उल्लेखनीय कामगिरी केली,आता लातूरमध्येही त्यांच्याकडून अपेक्षा असून आता या अशा गंभीर विषयावर पोलिस अधिक्षक सोमय मुंडे काय कार्यवाही करतील याकडे लातूरच्या जनतेचे लक्ष लागले आहे.