Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'आफताब'या हैवानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..या मागणी साठी मनसेचे आंदोलन

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
'आफताब'या हैवानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..या मागणी साठी मनसेचे आंदोलन








लातूर-मुंबई येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या केल्याची देशाला हादरुन टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. माणिकपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे तब्बल ५ महिन्यांनी या हत्येचा उलगडा केला आणि दिल्ली पोलीसांनी या नराधम आरोपीला अटक केली. अशा या हैवानियतीचा कळस असलेल्या अफताब ला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणी साठी मनसेने लातूर येथे शुक्रवार दि.१८नोव्हेंबर रोजी छत्रपति शिवाजी चौका मध्ये घटनेचा निशेध व्यक्त करत आंदोलन केले

वसईच्या विजय विहार काँप्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) आणि त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला याच्यासोबत प्रेम होते. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले , त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते व दोघांनी कॉल सेंटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. ४ ते ५ दिवसानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण सुरू झाली होती.आफताब याने १८ मे ला श्रद्धा हिचा गळा आवळून हत्या केली व नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात पहाटेच्या सुमारास नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकरून ते मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही.
अशा या भयंकर घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात उमटत आहेत.
अशा या हैवानियतीचा कळस असलेल्या अफताब ला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणी साठी मनसेने लातूर येथे शुक्रवार दि.१८नोव्हेंबर रोजी छत्रपति शिवाजी चौका मध्ये घटनेचा निशेध व्यक्त करत आंदोलन केले
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्ष प्रगती भगत, संजय राठोड(जि.अध्यक्ष),भागवत शिंदे(राज्य उपाध्यक्ष शेतकरी सेना),मनोज(तात्या)अभंगे(शहर अध्यक्ष),सचिन सिरसाठ(जि.स्वयंरोजगार विभाग),अंकुश शिंदे(जि.कामगार सेना),अर्जुन कोळी(जि.कामगार सेना),अॕड.अजय कलशेट्टी(जि.विधी विभाग),संग्राम रोडगे(ता.अध्यक्ष उदगीर),बजरंग ठाकुर,दत्ता मेह्ञे,वैभव जाधव,अजिंक्य मोरे,अनिल जाधव,धनंजय मुंढे,बालाजी पाटील,चंदु केंद्रे ,योगेश डोंगरे ,गहिनीनाथ सोमवंशी,अॕड.चापोलीकर,कुणाल यादव,गौरव भोसले,रोहित पवार,गोविंद उदगीरे,सिध्दु इरले,नाना धुमाळ,आकाश मोरे,दत्ता बनसोडे,अमोल बनसोडे,अमोल बनसोडे,रुषी घटमल,अनिल डोंगरे,नवनाथ कारले,ओम पवार,गोविंद नाईकवाडे,महेश क्षिरसागर,धिरज राऊत,वैभव चव्हाण ,अजित पुजारी इ.पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 


"लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात असताना लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीच्या शरीराचे ३५ तुकडे करून त्यांची अत्यंत थंड डोक्याने विल्हेवाट लावणाऱ्या तिच्या प्रियकराची कृत्ये अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला मान खाली घालायला लावणारी आहेत. मुंबईजवळच्या वसईत राहणारे हे कथित जोडपे दिल्लीत जाते काय, तिथे काही काळ राहते काय आणि तिने त्याच्यावर केलेल्या जीवापाड प्रेमाचे आणि विश्वासाचे फलित अशा अत्यंत हिणकस, नृशंस स्वरू पात दिसते काय.. कोणाही माणसाचे हे अनाकलनीय, अमानुष, हिंस्र रूप कोणाचाही नात्यांवरचा विश्वास उडवणारे, आपले जगणे, आपल्या आस्था, आपले विश्वास पुन्हा पुन्हा तपासून घ्यायला हवेत की काय असे वाटायला लावणारे आहे खरे ." 
जय महाराष्ट्र जय मनसे
प्रिती ताई भगत
(मनसे महिला जिल्हाध्यक्षा लातूर)



Previous Post Next Post