गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बंदुक व जिवंत काडतुसासह दोघांना अटक, एक फरार..
लातूर:लातूर शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे.शिक्षणामुळे लातूर कडे येण्याचा ओघ वाढत चालला आहे.याबरोबरच गुन्हेगारी वृत्तीचे प्रमाण ही त्याच गतीने पुढे सरकत असल्याचे आता या घटनेने स्पष्ट होत आहे.लातूर मध्ये पिस्टल, जिवंत काडतुस मिळाल्याने एकच खळबळ उडली आहे.विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे.
लातूर शहरातील कन्हेरी चौक परिसरात विवेकानंद चौक पोलीसांनी एक पिस्टल, जिवंत राऊंड, बुलेट मोटारसायकल, रोख रक्कम असा ५ लाख ५३ हजार ९७० रुपयांच्या ऐवजासह दोघा तरुणांना अटक केली असून एक तरुण फरार झाला आहे.
पहाटे विवेकानंद चौक पोलिसांनी लातूरच्या कन्हेरी चौक परिसरातून आकाश अण्णासाहेब होदाडे रा. कवठा, ता. औसा, हा. मु. प्रकाश नगर लातूर, महादेव रावसाहेब फड मुळ
रा. उदगीर तालुका, हा. मु. माताजी नगर लातूर यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्टल, जिवंत राऊंड, बुलेट मोटारसायकल, तीन मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५३ हजार ९७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याच प्रकरणातील खंडू पांढरे रा. माताजी नगर लातूर हा फरार झाला. या तिघाही जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास विवेकानंद पोलिस करत आहेत.