गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आक्षेपार्ह व्हीडीओ नवऱ्याला दाखवतो म्हणून विवाहितेवर अत्याचार !
लातूर/ अहमदपुर
भजनाच्या कार्यक्रमाला घरी आलेल्या मित्राने, मित्राच्याच बायकोचा बाथरुममधील अंघोळ करतानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ शुट करून हा व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला दाखवितो असे म्हणून त्याने दोन वर्षे तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून. सदर घटनेची माहिती पिडीत विवाहितेने पतीला दिल्यानंतर या तरुणाविरुध्द अहमदपूर पोलिसांत प्रकार महिलेने आपल्या नवऱ्याला हा प्रकार सांगताच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अहमदपूर तालुक्यातील गंगाहिप्परगा येथील रहिवासी असलेला स्वप्नील राजेंद्र टाकळे (वय २४) याचा मित्र अहदपूर तालुक्यातीलच गावात वास्तव्यास आहे. मित्राच्या गावात सप्त्याचा कार्यक्रम असल्यामुळे दोन वर्षापूर्वी स्वप्निल मित्राच्या गावात गेला होता. यावेळी मित्राच्या घरात गेल्यानंतर त्याची बायको बाथरुममध्ये अंघोळ करित असताना त्याच्या नजरेस पडली. याचा त्याने व्हिडीओ तयार केला. काही दिवसानंतर हा व्हिडीओ या विवाहितेला दाखवून त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हा व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला दाखवतो असे म्हणत त्याने दमदाटी करु लागला. कालांतराने ब्लॅकमेल करून त्याने या विवाहितेवर अनेकवेळा अत्याचार केला. हा प्रकार दि. १७ मार्च २०२२ पर्यंत सुरू होता. अखेर वैतागलेल्या पिडीत त्यांनी अहमदपूर पोलिसांत स्वप्नील राजेंद्र ५०७/२२ कलम ३७६-१, ३७६-२, एन ४५२, ३२३, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करताच बुधवारी (दि.९) सायंकाळी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे हे करीत आहेत.