गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आलेल्या धान्याची परस्पर विक्री;संचालकासह व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
लातूर : लातूर कोल्ड स्टोरेज आणि प्रा.लि. या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आलेला तब्बाल अडीच कोटी रुपयांचा माल शहरातील काही व्यापाऱ्यांनी परस्पर विकून फसवणुक केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांत शहरातील। संचालकासह नऊ जनांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिताराम नगर येथील रहिवासी असलेले (वय ३५) यांनी शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या लातुर कोल्ड स्टोरेज आणि प्रायव्हेट लि. या वेअर हाऊसमध्ये त्यांच्याकडील पाच गाडी उडीद (१ हजारकट्टे) व आठ गाठी सोयाबीन (१७०५ कट्टे) असा साधारण १ कोटी ५० लाख रुपयांचा माल सन २०१५ ते १७ नोव्हेंबर २०२२ या काळात धनराज अंकुश माने (वय ४५, व्यवसाय व्यापार रा. वेदान्त ट्रेडींग कंपनी, नियर अडत असोशियन ऑफीस एपीएमसी मार्केट यार्ड, लातुर) यांच्या मध्यस्थीने ठेवला होता. परंतु, या वेअर हॉसचे संचालक असलेले हणुमंत रा. वेदान्त ट्रेडींग कंपनी नियर अडत असोशियन ऑफीस एपीएमसी मार्केट यार्ड, लातुर), विजयकुमार सत्यनारायण मुदंडा (वय ५०, व्यावसाय व्यापार, रा. आदर्श
कालनी लातुर), हुकुमचंद बन्सीलाल खटोड (वय ६०, व्यवसाय व्यापार), इश्वरप्रसाद जगन्नाथ डागा (वय ५५, व्यवसाय व्यापार), अजित भगवानदास कामदार (वय ५६), शामसुंदर हणुमंत खटोड (वय ५६, व्यवसाय व्यापार), दिनेश चिरंजीलाल पपरूनिया (वय ६०, व्यवसाय व्यापार), राजेंद्र रुपचंद मालपाणी (वय ५५, व्यवसाय, व्यापार) यांनी हा जेंव्हा माल सोडवण्यासाठी प्रविण माने हे वेअरहाऊसवर गेले तेंव्हा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रविण माने यांनी दिलेल्या तक्रारिवरून १ कोटी ५० लाख रुपयांचा माल, बँक रेट प्रमाणे त्यावरील व्याज अशी २ कोटी ४२ लाख २५ हजार रुपयांची फसवणुक करुन माल परस्पर विकल्याची तक्रार दिली. या तक्रारिच्या आधारे एमआयडीसी पोलिसांत आणि प्रायव्हेट लि.चे ८ संचालक असा ९ जणांविरोधात गुरनं ६६३ / २२ कलम ४२०,० ४०३, ४०६, ४०९, ४१७ ३४ भादंवि अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.