Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ज्येष्ठ विधिज्ञ एड. बळवंत जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६३ शेतकऱ्यांना बी - बियाणांचे वाटप

ज्येष्ठ विधिज्ञ एड. बळवंत जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६३ शेतकऱ्यांना बी - बियाणांचे वाटप





लातूर : बाळासाहेबांची शिवसेनाचे लातूर जिल्हा प्रमुख ज्येष्ठ विधिज्ञ एड. बळवंत जाधव यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतनही केले. 

             ज्येष्ठ विधिज्ञ एड. बळवंत जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६३ शेतकऱ्यांना बी - बियाणांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी शिवसेना शहर प्रमुख  एड. परवेज पठाण ,दिनेश बोरा यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना  मागच्या काळात आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागल्याने बळवंत जाधव यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त ६३ शेतकऱ्यांना वाढदिवसाचा कोणताही अवांतर खर्च न करता बियाणांचे वाटप अशोक देडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ. सविता स्वामी, तालुका प्रमुख सदाशिव गव्हाणे, एड. अर्जुन जाधव,  विजयकुमार स्वामी, महिला शहर प्रमुख मीनाक्षीताई मुंदडा, बबिता गायकवाड, उप शहर प्रमुख विजयकुमार कांबळे, संदीपमामा जाधव, श्रीनिवास लांडगे, एड. बालाजी सूर्यवंशी, गिरीश सगर, प्रशांत स्वामी, लायकभाई अब्दुल्ला खान, वली खान , सय्यद मौला पठाण, नबी रसूल सय्यद, इलियासखान पठाण, हुजुरभाई यांसह शेतकरी बांधव, शिवसेना पदाधिकारी यांची  उपस्थिती होती. 

तसेच शहराच्या पूर्व भागातील इंदिरा नगरमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आई सुरक्षित तर घर सुरक्षित या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात आले. त्याचबरोबर विधवा व निराधार महिलांना साड्यांचे वाटप  करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महिला शहर प्रमुख बबिता गायकवाड  व एड. परवेज पठाण , दिनेश बोरा यांनी केले होते. यावेळी ३०० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात अली. तपासणी केलेल्या महिलांना मोफत औषधीचेही वितरण यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर मातोश्री वृद्धाश्रमातील आजी - आजोबांना  दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. जाधव यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून आजी - आजोबांना  मिष्ठान्न  भोजनही देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महिला शहर प्रमुख मीनाक्षीताई मुंदडा व उप जिल्हा प्रमुख सतीश देशमुख यांनी केले होते. याप्रसंगी एड. अर्जुन जाधव, परवेज पठाण, दिनेश बोरा, संदीपमामा जाधव, इमरान  खान, शंकर मुंदडा, वंदना गोरे, विष्णू पाटील, रेणापूर शहर प्रमुख चव्हाण, राठोड यासह शिवसेनेचे सर्व प[पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शहरातील एसएससी बोर्डाजवळील जवाहरलाल माध्यमिक शाळेत  तसेच ग्रामीण भागातील शाळेमध्ये  सर्व मिळून ३ हजार ५००  विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही यानिमित्ताने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका प्रमुख सदाशिव गव्हाणे यांनी केले होते. 

आत्माराम जाधव, बबन पाटील, हरिभाऊ कोनाळीकर , दयानंद नरवडे , अनिल जाधव यांसह  शाळेतील शिक्षक - शिक्षिका यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे छत्रपती  शिवाजी महाराज  चौक, विवेकानंद चौकात  कामगारांना व गरजूना खिचडीचे वाटप करण्यात आले. 

----------------------
Previous Post Next Post