अग्रवाल समाजाच्या अग्रकुलदेवी श्री माता महालक्ष्मी रथयात्रेचे लातुरात हर्षोल्हासात स्वागत
लातूर : अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन, अग्रोहा द्वारा आयोजित करण्यात आलेल्या अग्रकुलदेवी श्री माता महालक्ष्मीजींच्या रथयात्रेचे लातुरात रविवारी हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. या निमित्त समस्त अग्रवाल समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रथयात्रा व शोभायात्रेने समस्त लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
अग्रकुलदेवी श्री माता महालक्ष्मीजींच्या रथयात्रेचे लातूर शहरात रविवारी दुपारी अग्रसेन भवन या ठिकाणी आगमन झाले. रथयात्रेचे आगमन झाल्यानंतर यात्रेत सहभागी मान्यवरांच्या अल्पोपहारानंतर फेटे बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. अग्रकुलदेवी श्री माता महालक्ष्मीजींची आरती झाल्यानंतर अग्रसेन भवन येथून रथयात्रा काढण्यात आली. ही रथयात्रा अग्रसेन भवन पासून निघून गांधी चौक, हनुमान चौक, गंज गोलाई, सराफ लाईन,गुळ मार्केट या मार्गाने अष्टविनायक मंदिरापर्यंत पोहोचली. रथयात्रा अष्टविनायक मंदिरात पोहचल्यानंतर
यजमान रमेशचंद्र अग्रवाल, मुलचंद ब्रिजवासी, दिनेशचंद्र ब्रिजवासी, अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने आरती करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रदीपकुमार राठी व सौ. कमलादेवी राठी यांच्या हस्तेही माताजींची आरती करण्यात आली.
या रथयात्रा व शोभायात्रेत नंदकिशोर अग्रवाल, अशोक अग्रवाल, कमलकिशोर अग्रवाल, संजय अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, आनंद अग्रवाल,डॉ. अशोक पोद्दार, ओम पोद्दार , विनोद अग्रवाल, श्रीराम अग्रवाल, राजेश अग्रवाल, मुकेश मित्तल, राजेश मित्तल, राजगोपाल अग्रवाल, विशाल अग्रवाल, उमेश अग्रवाल, शैलेश अग्रवाल, तुषार अग्रवाल, शिवकांत ब्रिजवासी, आदित्य ब्रिजवासी, श्रीमती मधू बंसल , सौ. स्नेहलता अग्रवाल, सौ. वंदना ब्रिजवासी, सौ. संगीता ब्रिजवासी यांसह समस्त अग्रवाल समाज बांधव तसेच समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.