Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गँगस्टर छोटा राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी कोर्टाचा निर्णय

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गँगस्टर छोटा राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी कोर्टाचा निर्णय


मुंबई- कुख्यात गुंड छोटा राजनसह चार जणांची २००९ सालच्या एका दुहेरी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छोटा राजनविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणांना अपयश आल्याचा ठपका ठेवत न्यायालयानं त्याच्यासह चारही आरोपींची संबंधित प्रकरणातून मुक्तता केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे हे चौथे प्रकरण आहे. ज्यात छोटा राजनला आरोपमुक्त करण्यात आलं आहे. याआधी छोटा राजन याच्यावर ३० ऑक्टोबर १९९९ रोजी दहिसर पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात

आल्यानंतर छोटा राजन फरार आरोपी म्हणून दाखविण्यात आला होता. दहिसर येथे १९९९ साली व्यावसायिक नारायण पुजारी यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न केल्यानंतर चार गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. २०१५ मध्ये छोटा राजनला एक इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले होते. तेव्हापासून राजन विरोधातील खटल्यांची सुनावणी कोर्टात सुरू आहे
Previous Post Next Post