Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

किल्लारी परिसरात सौम्य भूकंप

किल्लारी परिसरात सौम्य भूकंप

लातूर, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्यातील किल्लारी परिसरात शनिवारी (दि. 19) रात्री दोन वाजून सात मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली असून या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात होता. रिश्टर स्केलमध्ये त्याची तीव्रता 2.4 इतकी नोंदविली गेली.

तीव्रतेच्या आधारावर 2.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे वर्गीकरण सूक्ष्म कॅटेगिरीमध्ये येते. या भूकंपामुळे परिसरात कोणतेही नुकसान झालेले नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे
Previous Post Next Post