राष्ट्रसंतांच्या समाधी विषयी अफवा पसरवणाऱ्या वर गुन्हे दाखल करा
भक्तांचे तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन
तीव्र आंदोलनाचा इशारा.
अहमदपूरर (प्रतिनिधी) राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधी विषयी मागील दोन दिवसापासून एका निवेदनाद्वारे काही समाजकंटकांनी समाधी विषयी अफवा पसरल्याने भक्ततात अस्वस्थता निर्माण झाली असून खोटे निवेदन देणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रसंतांच्या भक्तांच्या वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे. दोन दिवसापूर्वी माधवराव बर्गे शंकराव मोरगे संदीप डाकुळगे व्यकटराव मुद्दे बबन हैंबतपुरे सुभाष सराफ यांनी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रसंतांचे समाधी व त्यांच्या अस्ती पळवून नेल्याची खोटी व भक्तांची दिशाभूल करणारी तक्रार दिली होती त्यामुळे भक्तांमध्ये त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला होता त्याबाबतच आज अहमदपूर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे सर्व भक्तांच्या वतीने निवेदन देऊन तहसील कार्यालय ते पोलीस स्टेशन मुक मोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसापासून काही समाजकंटकांनी अस्थि विषयी संभ्रम निर्माण करणाऱ्या निवेदन दिले होते वस्तूत लिंगायत समाजामध्ये अस्थी नसून समाधी असते व समाधी हलवली जात नाही हे माहिती असून ही केवळ राष्ट्रसंत व भगतसळाची बदनामी करावी या दुष्ट हेतूने निवेदने प्रसिद्धी करून त्यांनी भक्तांची दिशाभूल करत आलेली आहे तसेच राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तर अधिकारी राज शेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य व त्यांच्या अज्ञान पालन करते आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांच्या विषयी अनेक वाद विवाद करत आहेत भक्ती स्थळावर झालेली प्रगती व दररोज चालू असलेले दासोहन सेवा ही त्यांना पाहवत नसल्यामुळे सदर दिशाभूल करणारे निवेदन दिले असल्याचे निवेदन करताना म्हटले आहे या निवेदनावर भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभारगेकर माजी मंत्री विनायकराव पाटील मा आ बब्रुवान खंदाडे शिवकुमार उटगे मनमत आप्पा पालापुरे ॲड बाबुराव देशमुख काशिनाथ गाढवे शिवशंकर शिवपुजे राजेश्वर कल्याणी सतीश लोहारे अनिल कासनाळे दिलीप शिवपुजे एडवोकेट इरनाथ कोरे शिवशंकर हमने माधवराव शेटकर दिलीप महाजन चंद्रकांत आमने एडवोकेट किशोर कोरे नगरसेवक अभय मिरकले संदीप चौधरी रवी महाजन सय्यद साजिद भाई सुरेश कोरे चंद्रशेखर डांगे लक्ष्मीकांत कासनाळे शिवराज हामणे निळकंठ पाटील , जनार्दन बेंद्रे कर अनिल फुलारी उत्तरेश्वर हलकुडे गजानन फुलारी शंकराप्पा येरुळे बसवराज नीला दयानंद वलांडे अभिजीत पुणे अमित पाटील बालाजी शिवपुजे प्रा विश्वंभर स्वामी उमाकांत तत्तापुरे अमोल सांगवीकर बालाजी काड वदे शिवराज बोंडगे संजय उस्तुर्गेसह शेकडो भक्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत कार्यवाहीची मागणी खोटे व भक्तांची दिशाभूल करणारे निवेदन देणाऱ्या वरती प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी व समाधी मंदिरास अडथळा करणाऱ्यांना गुन्हे दाखल करावी अशी मागणी माझी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले समाधी मंदिर होणारच अज्ञाताविरुद्ध खोट्या तक्रारी देऊन भक्तांची दिशाभूल करणाऱ्यांचे समाधी मंदिर बांधकाम होऊ नये हीच भावना असून समाधी मंदिर हे सर्व समाजात च्या आस्थेचा विषय असल्यामुळे समाधी मंदिर होणारच असल्याचे भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभारेकर यांनी सांगितले