लातूरात ब्युटी फाउंडेशन च्या वतीने महिलांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन...
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रसिद्ध अनुप्रिया पाटील प्रशिक्षण देणार
लातूर प्रतिनिधी: आपण 21 व्या शतकात वाटचाल केली आहे. आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे. या आधुनिक युगात महिलाही मागे नाहीत याच अनुषंगाने लातूरत ब्युटी पार्लर चालविण्यात येणाऱ्या महिला करिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रसिद्ध अनुप्रिया पाटील यांच्या उच्चशिक्षित मार्गदर्शनाखाली सर्व महिलांसाठी केश रचना प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ब्युटी फाउंडेशनचे संचालक सुदर्शन यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की प्रसिद्ध अनुप्रिया पाटील ह्या उच्चशिक्षित असून ब्युटी पार्लरचे विविध प्रकारचे कोर्स उत्तम रित्या पूर्ण केल्या आहेत या सोबतच रशियाचे जगप्रसिद्ध जॉर्जी कोट यांच्याकडून लेवल फर्स्ट व लेव्हल सेकंड याचे उत्तमरित्या प्रशिक्षण घेऊन पूर्ण केले आहे. तसेच जगप्रसिद्ध फारूक शामुराटोह यांच्याकडून ब्रायडल हेअर स्टाईल चे कोर्स पूर्ण केले असून आज त्या औरंगाबाद येथे महिलांसाठी बिबा स्पा अँड सलून या नावाने उच्च दर्जाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस चालवितात आजपर्यंत त्यांनी हजारो महिलांना ब्युटी पार्लरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच त्यांनी अमरावती, यवतमाळ ,पुणे ,मुंबई, बेंगलोर, मैसूर आदी विविध ठिकाणी मेकअप व सेमिनारचे आयोजन करून जवळपास 5000 महिलांना प्रशिक्षण दिले आहे. याच अनुषंगाने लातूरात दिनांक 15,16,17 नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय हेअर स्टाईल प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारच्या केस रचना अद्यावत परिपूर्ण माहिती पाटील मॅडम देणार आहेत याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन ब्युटी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे इच्छुक महिलांनी 98 60 50 92 73 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.