डिझेल टॅकर अपघातातील प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढतांना
जखमी झालेल्या अजहर शेखच्या उपचार खर्चांची जबाबदारी
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली
लातूर प्रतिनिधी २५ नोव्हेंबर २०२२ :
लातूर – नांदेड रस्त्यावर परवा रात्री भातखेडा जवळ झालेल्या डिझेल टँकर व
ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात सात वाहने जळाली. यावेळी राज्य परिवहन
महामंडळाच्या बसलाही आगीची झळ पोहोचली दरम्यान या बसमध्ये शिरूर ताजबंद
येथून बसलेल्या अजहर शेख यांनी संकटाच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न
करता पेटलेल्या बसमधील ९ सहप्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र
यावेळी भडका उडाल्याने तो ६५ टक्के भाजला असून त्यांच्यावर लहाने
रूग्णालय, लातूर येथे उपचार सुरू आहेत, ही माहिती समजताच राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार लातूर शहर
जिल्हा काँग्रेस कमिटीने वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी
घेतली आहे, अशी माहिती लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.
किरण जाधव यांनी दिली आहे.
परवा या अपघाताचे वृत्त समजताच राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक
कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी प्रशासन, पोलीस व वैद्यकीय यंत्रणांशी संपर्क साधून या
अपघातात जखमी झालेल्यांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या भीषण अपघातात नांदेडहून लातूरला जाणाऱ्या एका एसटी बसलाही आग लागली
होती. या बसमधील शिरूर ताजबंद येथील तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून
तब्बल 9 प्रवाश्यांचा जीव वाचवला. दुर्दैवाने यावेळी तो भाजला असून
त्यांच्यावर लहाने रूग्णालय, लातूर येथे उपचार सुरू आहेत. ही माहिती
मिळताच माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे
माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्याच्या
प्रकृतीची विचारपूस केली, आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला
वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेण्याच्या सुचना दिल्या.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी लहाने
रूग्णालय येथे जाऊन अजहर शेख यांच्या वरील उपचाराची माहिती घेतली,
त्यांच्या कुटूंबियांना आधार दिला आणि उपचारासाठीच्या सर्व खर्चाची
जबाबदारी लातूर शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीने घेतली असल्याचे त्यांना
सांगितले. यावेळी रुग्णालयात लातूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, समद पटेल, काँग्रेस सोशल मिडीयाचे
प्रविण सुर्यवंशी, महेश काळे, ॲड.देविदास बोरुळे पाटील आदी हजर होते.