महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात, बाबा रामदेव यांचे वाचाळ वक्तव्य
पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन शुक्रवारी ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी बाबा रामदेव हे महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वाचाळ वक्तव्य करुन बाबा रामदेव यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण महिलांचा अपमान केला असल्याची तिव्र भावना महिला वर्गातून उमटत आहेत.बहुतेक या 'बाबा'चे डोके अफाट पैशाच्या कमयीमुळे फिरले असल्याचे दिसत आहे.खरे पाहिले तर तोंड लपवून पळणारा हा 'बाबा'काही वर्षा मध्येच हजारोंकरोड रुपयाचा मालक झाला आहे तो फक्त महिलांच्याच मदतीने,आमच्या भोळया भाबड्या महिला याचे आयुर्वेदिक उत्पादने खरिदी करतात परंतू आता या।उत्पादनास महिला वर्गांनी कायमची बंदी घालून धडा शिकवावा अशी तिव्र भावना महिला वर्गातून उमटत आहेत
महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात च नाही तर देशात उमटत आहेत.