Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा
46 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, 02 गुन्हे दाखल
 पोलीस ठाणे कासारशिरशी ची कारवाई.*




              लातूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे , उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा डॉ.दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रेवनाथ डमाळे यांच्या नेतृत्वाखाली कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 02 इसमावर पोलीस ठाणे कासारशिरशीच्या पथकाने दिनांक 28/11/2022 रोजी सायंकाळच्या सुमारास छापामारी केली. यामध्ये 915 लिटर रसायन, साहित्य, हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 46 हजार रुपयेचे रसायन, हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे. या कार्यवाहीत 

1) उमाकांत ऊर्फ दगडु रोहिदास यंपाळे, वय 35 वर्ष , राहणार कोराळवाडी. तालुका निलंगा

2) अजय अंबादास रेवने वय 20 वर्ष राहणार,कोराळवाडी, तालुका निलंगा

                 अशा एकूण 2 आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे कलम 65(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 02 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
              सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर , पोलिस अमलदार ,श्रीकांत वरवटे, मनोज चव्हाण ,अमोल नागमोडे यांनी केली आहे.
Previous Post Next Post