गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
'मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची होणार चौकशी; सहकार मंत्र्यांनी दिले आदेश
लातूर-लातूर परिसरातील शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि येथे कृषी आधारित उद्योगाची वाढ व्हावी या उद्देशाने देश ॲग्रोची स्थापना करण्यात आली असून सोयाबीन प्रक्रिया आणि सोयाबीन आधारित विशेष उत्पादने या उद्योगामध्ये घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने अतिरिक्त लातूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड या उद्योग घटकास रितसर आणि नियमानुसार लिजवर दिलेला आहे.
देश ॲग्रोचे प्रवर्तक रितेश आणि जिनिलिया देशमुख हे कायद्याचे आदर राखणारे आहेत. तसेच सामाजिक भान बाळगणारे असल्याची त्यांची ओळख आहे. या उद्योग घटकासाठी वित्तीय संस्थांनीही नियमानुसार कर्ज वितरित केले असल्याने संबंधितांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरुन नाहीत. ॲड. प्रदीप मोरे आणि गुरुनाथ मगे यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या या कृषी आधारित उद्योगासाठी विरोधी भूमिका घेऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे असेही केसरे यांनी आपल्या खुलाशात म्हटले होते परंतू आता प्रकरणाला गंभीर वळण लागले असून अभिनेता रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या 'मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड' (Desh Agro Pvt Ltd) या कंपनीला शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लातूरच्या एमआयडीसीमधील भूखंड दिला होता या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिल्याचे पत्र लातूर भाजपाने जारी केले आहे
भूखंड गहाण ठेवून कंपनीने कर्ज घेतले : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मे.देश ॲग्रो प्रा.लि. या कंपनीला पहिल्यांदा 61 कोटी रुपयांचे कर्ज दिले. ज्यावेळी हे कर्ज दिले तेव्हा कंपनीला शासनाकडून लातूरच्या एमआयडीसीतील भूखंड मिळाला होता. तो भूखंड गहाण ठेवून कंपनीने 61 कोटी रुपयांचे कर्ज बॅंकेकडून घेतले होते. त्यानंतर रितेश देशमुख यांचे बंधू लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाले. तेव्हा कंपनीला मिळालेला एमआयडीसीतील तोच भूखंड पुन्हा गहाण ठेवून 55 कोटी रुपयाचे कर्ज मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले. असे एकूण दोन टप्प्यात 116 कोटी रुपयांचे कर्ज बॅंकेने कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप लातूर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे व शहर जिल्हा उपाध्यक्ष ॲड.प्रदीप मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे रीतसर तक्रार करून या कर्ज प्रकरणी भाजपकडून शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. याची दखल घेत सहकार मंत्र्यांनी सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना या कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अभिनेता रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मे.देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व आ.धिरज देशमुख चेअरमन असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जबाबदार अधिकारी यांच्यावर दोष निश्चित करून पुढील काळात कठोर कारवाई होणार असल्याचे लातूर भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष ॲड .प्रदीप मोरे यांनी सांगितले आहे.